पाचवी-शिष्यवृत्ती-गणित-सरळव्याज /std-5th-Scholarship-ganit-saralvyaj-Simple Interest

         

पाचवी शिष्यवृत्ती

गणित

सरळव्याज 

(Saralvyaj)


महत्वाचे संबोध

1. मुद्द्दल  - बँकेत ठेवलेली वा बँकेकडून कर्जाने घेतलेल्या रकमेस मुद्दल असे म्हणतात.

2. दर - ठेवीवर किंवा कर्जावर बँक व्याज आकारताना, एका वर्षासाठी 100 रूपयांवर काही विशिष्ट रक्कमेप्रमाणे देत किंवा घेत असते, ही रक्कम म्हणजेच दर होय. व्याजाचा दर हा द.सा.द.शे. (दर साल दर शेकडा एका वर्षासाठी 100 रूपयांकरिता) मध्ये सांगितला जातो. व्याजावा द.सा.द.शे. दर म्हणजेच प्रत्येक वर्षांसाठी प्रत्येक शंभरासाठी द्यावे लागणारे भाडे किंवा व्याज होय.

3. कालावधी- बँकेमध्ये ठेवलेली ठेव वा बँकेकडून घेतलेल्या कर्जासाठी काही मुदत ठरलेली असते त्यास कालावधी असे म्हणतात.

4. सरळव्याज / व्याज - बँकेत रक्कम ठेवल्याब‌द्दल बँक ठेवीदारांना काही रकम मोबदला म्हणून देते वा बँकेकडून कर्जाने घेतलेली रक्कम वापरावयास दिल्याबद्दल कर्जदाराकडून मोबादला म्हणून जी जादाची रक्कम आकारते त्या रक्कमेला व्याज असे म्हणतात.

5. रास - मुद्दल व त्यावरील व्याज यांच्या बेरजेला रास असे म्हणतात.

* सूत्रे-

 1. सरळव्याज = (मुद्दल × दर × कालावधी)/ 100

2. मुद्दल = (सरळव्याज x 100)/ (दर × कालावधी)
 
3. दर = (सरळव्याज x 100) / (मुद्दल × कालावधी)

4. कालावधी = (सरळव्याज x 100) /(मुद्दल × दर)
5. रास = मुद्दल + व्याज
6. मुद्दल = रास - व्याज
7. व्याज = रास - मुद्दल
8. दर = 100 × (पट - 1)/कालावधी

9. कालावधी = 100 × (पट - 1) ÷ दर

10. मुद्दल = (रास × 100) / (100 + दर x व्याज)


वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.


शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.




Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post