TET बंधनकारक – सर्वोच्च न्यायालयाचा 1 सप्टेंबर 2025 चा निर्णय
प्रस्तावना : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अर्थात Teacher Eligibity Test हा शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता सुनिश्चित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता शिक्षक भरती आणि पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे.प्रत्यक्षात, या निर्णयामुळे सर्व शिक्षकांसाठी TET अत्यंत महत्त्वाचा झाला आहे – नियुक्तीसाठी, सेवेत राहण्यासाठी, आणि पदोन्नतीसाठी.
निर्णयाचे मुख्य मुद्दे
- शिक्षक भरती आणि पदोन्नतीसाठी TET पास करणे आवश्यक.
- अल्पसंख्यांक संस्थांविषयीचा प्रश्न मोठ्या बेंचकडे रेफर केला आहे.
- 5 वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना TET पास करणे आवश्यक नाही.
- आधीच पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना पुढील 2 वर्षांत TET पास करणे बंधनकारक.
- 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना TET उत्तीर्ण केल्याशिवाय पुढे पदोन्नती मिळणार नाही.
- जर १-५ साठी शिकवत असाल तर TET पेपर १
व ६-८ साठी शिकवत असाल तर TET पेपर २
तुम्हीं राज्य शासन घेते ती TET किंवा केंद्र शासन घेते ती CTET पास होणे आवश्यक आहे.
शिक्षण क्षेत्रावरील प्रभाव
या निर्णयामुळे शिक्षक नियुक्ती व पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता येईल. तसेच, सर्व राज्यांमध्ये शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी एकसमान पात्रता निकष लागू होतील. अल्पसंख्यांक संस्थांवरील अंतिम निर्णय मोठ्या पीठाच्या निर्णयानंतर अपेक्षित आहे.
निष्कर्ष
माननिय सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे.शासकीय शिक्षकांना सेवेत सातत्यता ठेवण्यासाठी २ वर्षात TET पास होणे बंधनकारक,सोबत पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती घेतलेल्या शिक्षकांना सुद्धा २ वर्षात TET( पेपर २) पास होणे बंधनकारक, फक्त निवृत्ती ला ज्या शिक्षकांचे ५ वर्ष बाकी आहेत,त्यांना यातून सुट मिळालेली आहे. जे शिक्षक २ वर्षात TET पास होणार नाहीत त्यांना,अनिवार्य(सक्तीची) निवृत्ती देऊन,प्रचलित निकषानुसार पेन्शन व इतर लाभ देण्यात येतील. अधिक माहितीसाठी आपण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वाचू शकाल.सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिक्षकांसाठी कठीण वाटू शकतो, पण शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता टिकवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आता सर्व उमेदवारांनी TET तयारी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न | उत्तर |
---|---|
TET शिवाय पदोन्नती शक्य आहे का? | नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. |
अल्पसंख्यांक संस्थांवर नियम लागू होणार का? | यावरील निर्णय मोठ्या बेंचकडे रेफर झाला आहे. |
ज्यांना पदोन्नती मिळाली आहे त्यांना किती मुदत? | 2 वर्षांच्या आत TET पास करणे आवश्यक आहे. |
5 वर्षांपेक्षा कमी सेवेचे शिक्षक? | त्यांना सवलत आहे. |
👉 या निर्णयाबद्दल तुमचे मत खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच ही माहिती इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.
ज्यांना 24 वर्षाचा लाब घ्यायचा असेल तर?
ردحذفवय 53 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर सूट आहे.
حذفNice decision. It will improve the quality of education.
ردحذف*❤️❤️❤️
حذف5 वर्षाची अट केव्हापासून ,कोणत्या तारखेपासून लागू होणार आहे ?
ردحذف1 सप्टेंबर 2025
حذفVery Good decision
ردحذفकोणत्या सालापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे?त्या वर्षापासून ज्याच्या सेवेला 5 वर्ष शिल्लक आहेत त्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही.
ردحذف168 क्रमांकानुसार 3 सप्टेंबर 2001 पूर्वीच्या शिक्षकांना नाही.... पण पदोन्नती हवे असेल तर द्यावी लागेल
ردحذفApeksha balbhim kamble
ردحذفTET प्रमाणपत्र व सर्टिफिकेट मिळते यापूर्वी त्यामध्ये घोटाळे झाले आहेत
ردحذف2010 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात माझी निवड झाली होती मी cet pariksha उत्तीर्ण केली होती पण joining sep 2011 la jhali tar ata tet परीक्षा पास करणे अनिवार्य आहे का
ردحذفमुळात आधीचे सर्व हुशार होते का? त्यांनी नक्की काय पराक्रम गाजवलाय की त्या सर्वांना सुट आहे आणि ज्यांची सेवा जास्त त्यांना अनिवार्य. म्हणजे त्यांचे पेंशन चे पैसे द्यायला आहे तुमच्याकडे आणि शिक्षकांचा पगार नाही. आतांचे शिक्षक शिकवत नाहीत का.? थोडीशी लाज वाटू द्या. मग एक करा. ज्याचे ५ वर्ष बाकी आहे. त्यांनी पण परीक्षा द्यावी बी.एड ला लागू करा. फक्त डी एड. ला का. ५ वर्ष राहीलेल्याना परीक्षा पास झाले तरच pension द्यावी.
ردحذف