प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - गुणाकार

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
विभाग - गणित
 घटक - गुणाकार




गुणाकार - एकावरून अनेक वस्तूंची किंमत काढणे. या क्रियेला 'गुणाकार' म्हणतात.

गुणाकार या क्रियेमध्ये गुण्य, गुणक व गुणाकार हे घटक असतात.

कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार नेहमी शून्य येतो.

शाब्दिक उदाहरण नीट वाचून कोणती क्रिया करावी लागेल हे ठरविणे.

गुण्य, गुणक व गुणाकार यापैकी दोन घटक दिलेले असतात. तेव्हा तिसरा घटक काढता येतो.

कोणत्याही संख्येला एक ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या असते.

दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो. या अंकांच्या गुणकारातील एकक स्थानी जो अंक असतो, तोच अंक मूळच्या दोन संख्याच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो.

कोणत्याही संख्येला अशा म्हणजे एकावर शून्य असणाऱ्या संख्यांनी गुणताना गुणाकारात गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील शून्यांएवढी शून्ये लिहावीत.

दोन अंकांचा गुणाकार करताना, गुणाकारात कोणता विशिष्ट अंक एकक स्थानी येईल, हे समजणे काही वेळा जरुरी असते. अपेक्षित गुणाकार मिळण्यासाठी कोणते दोन अंक निवडायला हवेत, हे ठरविणे आवश्यक असते. 


1 تعليقات

Thanks

إرسال تعليق
أحدث أقدم