शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६ - अंतरिम उत्तरसूची व आक्षेप नोंदणी
Scholarship Exam February 2026 - Interim Answer key
📢*महत्त्वाची सूचना*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व संचनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📍 *महत्त्वाचे मुद्दे :*
*आक्षेप नोंदणी :* उत्तरसूची किंवा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत काही आक्षेप असल्यास, ते संबंधित संकेतस्थळावर दिनांक १७/०३/२०२६ पर्यंत नोंदवता येतील.
*नोंदणी पद्धत :* शाळांना त्यांच्या लॉगीनमधून, तर पालकांना संकेतस्थळावरील थेट लिंकद्वारे आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
*माहिती दुरुस्ती :* शाळा किंवा विद्यार्थ्यांच्या अर्जातील माहितीत काही दुरुस्ती (उदा. नाव, जन्मतारीख इ.) आवश्यक असल्यास, त्याबाबतचा अर्जही शाळा लॉगीनमध्ये उपलब्ध आहे.
*मुदत :* विहित मुदतीनंतर (१७ मार्च २०२६ नंतर) प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा किंवा दुरुस्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
✅ *उत्तरसूची डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा ⤵️⤵️


.png)