प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - लांबी, वस्तुमान, धारकता

 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - चौथी 

 विभाग - गणित

घटक - लांबी, वस्तुमान, धारकता 


Month of the year ऑनलाईन टेस्ट

दैनंदिन जीवनात अंतर, वस्तुमान आणि घनफळ यांचे मापन ही दैनंदिन गरज आहे. आपल्या गरजेनुमाह मापनासाठी लहान-मोठी एकके वापरतात. किलोमीटर, मीटर व सेंटिमीटर ही एकके अंतरासाठी, लीटर मिलिलीटर ही एकके घनफळासाठी आणि किलोग्रॅम, ग्रॅम ही एकके वस्तुमानासाठी वापरतो.


लांबी


लांबी (अंतर) मोजण्याचे मूलभूत एकक मीटर हे आहे.


1 सेंटिमीटर = 10 मिलिमीटर (मिमी) । मीटर = 100 सेंटिमीटर (सेमी)।

किलोमीटर = 1000 मीटर (मी)


मूळ एककाच्या मागे ग्रीक शब्द जोडून लहान-मोठी एकके तयार होता.


उदा. सेंटीमीटर = (शतांश मीटर), किलोमीटर (हजार मीटर), मिलिमीटर = (सहस्रांश मीटर)


वस्तुमान


वस्तूमानाचे मूलभूत एकक किलोग्रॅम हे आहे.


1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम


1 ग्रॅम = 1000 मिली ग्रॅम


1 किंटल = 100 किलोग्रॅम


मूळ एककाच्या मागे ग्रीक शब्द जोडून लहान मोठी एकके तयार होतात.


उदा. सेंटीग्रॅम = (शतांश ग्रॅम), किलोग्रॅम (हजार ग्रॅम), मिलिग्रॅम (सहस्त्रांश ग्रॅम)


धारकता


धारकतचे प्रमाणित एकक लीटर हे आहे.


1 किलोलीटर = 1000 लीटर


1000 मिलिलीटर = 1 लीटर


मूळ एककाच्या मागे ग्रीक शब्द जोडून लहान- मोठी एकके तयार होता. उदा. सेंटीलीटर = ( शतांश लीटर), किलोलीटर = (हजार लीटर), मिलिलीटर = (सहस्रांश लीटर)


नमुना प्रश्न 

प्र.1) पावणेतीन मीटर = ? सें.मी.

1) 375

2) 3750

3) 275

4) 2750


स्पष्टीकरण : 1 मीटर = 100 से.मी. म्हणून पावणेतीन मीटर = 100+100+75=275 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे.



1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post