प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - गणित
घटक - वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे
- वजाबाकी करताना सर्व संख्या त्यांच्या स्थानांनुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घ्याव्यात.
- हातचा असल्यास न विसरता घेणे किंवा हातचे मनात ठेवायची सवय लावा.
- मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी.
- शाब्दिक उदाहरण नीट वाचून कोणती क्रिया करावी लागेल हे ठरविणे.
- हातच्याची वजाबाकी काळजीपूर्वक करावी.
नमुना प्रश्न
प्र.1) गौरीने 5690 रुपयांपैकी 2930 रु. रूपेशला, 1260 रु. सीमाला दिले व उरलेली रक्कम बँकेत ठेवली तर तिने किती रक्कम बँकेत ठेवली?
1) 4190
2) 8620
3) 1500
4) 6950
स्पष्टीकरण : 5690 मधून 2930 व 1260 वजा केल्यावर 1500 हे उत्तर येते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे.
🎯 इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी - क्लिक करा

Om Dinesh Bate
ReplyDelete