प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - बुद्धिमत्ता
घटक - वर्गीकरण संख्या
संख्या या घटकामध्ये चार संख्या दिलेल्या असतात. तीन संख्याचा एक गट बनतो. एक संख्या ही त्या गटात न बसणारी असते. या घटकामध्ये प्रश्न सोडविण्यासाठी २ ते ३० चे पाढे येणे अपेक्षित आहे. सम-विषम संख्या, मूळ संख्या, संख्यांचे वर्ग, घन, क्रमवार संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यावर आधारित प्रश्न असतात.
नमुना प्रश्न -
प्र. 1 ते 2 साठी सूचना : खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा.
प्र.1
1) २३५
2) १२३
३) ४३६
4) ५२७
स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील पर्यायांमध्ये शतक व दशक स्थानच्या अंकांची बेरीज एकक आहे. पर्याय १ मध्ये २+३=५, पर्याय २ मध्ये १+२=३, पर्याय ३ मध्ये ४+३=७ व पर्याय ४ मध्ये ५+२=७ येते म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे.
प्र.2
1) २३४
2) २६८
३) ३५६
4) ९८७
स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील पर्यायांमध्ये २३४, ३५६ व २६८ या संख्या सम आहेत व २६८ ही संख्या सम म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.
