प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - गणित
घटक : 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या
मूळ संख्या : ज्या संख्येच्या 1 ने किंवा फक्त त्याच संख्येने भाग जातो. त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात.
1) 2 ही एकमेव मूळ संख्या सम आहे. उरलेल्या सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत.
2 ते 10 मधील मूळ संख्या - 2,3,5,7
11 ते 20 मधील मूळ संख्या - 11,13,17,19
21 ते 30 मधील मूळ संख्या - 23,29
31 ते 40 मधील मूळ संख्या - 31, 37
41 ते 50 मधील मूळ संख्या - 41, 43, 47
51 ते 60 मधील मूळ संख्या - 53,59
61 ते 70 मधील मूळ संख्या - 61, 67
71 ते 80 मधील मूळ संख्या - 71, 73, 79
81 ते 90 मधील मूळ संख्या - 83, 89
91 ते 100 मधील मूळ संख्या - 97
संयुक्त संख्या: दोनपेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना 'संयुक्त संख्या' म्हणतात.
1) 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही.
1) 2 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत.
उदा. 4, 6, 8, 9, 10..... एकूण 74
जोडमूळ संख्या: दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते, तिला 'जोडमूळ संख्या' म्हणतात
1) 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत.
3 - 5, 5-7, 11 - 13, 17 - 19, 29-31, 41 - 43, 59 - 61, 71-73
उदा. 3,5 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे.
यामध्ये 4 ही संयुक्त संख्या 3 व 5 या मूळ संख्येच्या दरम्यान आहे.
सहमूळ संख्या : दिलेल्या संख्यांना 1 हा एकच सामाईक विभाजक असतो, त्या संख्यांना 'सहमूळ प्र म्हणतात.
1) क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या या सहमूळ संख्या असतात.
2) कोणत्याही दोन क्रमावार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते.
उदा. 5 चे विभाजक = 1 , 5
6 चे विभाजक = 1 ,2,3,6
सामाईक अवयव - 1
म्हणून 5 व 6 सहमूळ संख्या
त्रिकोणी संख्या : ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना 'त्रिकोणी संख्या' असे म्हणतात.
1) दोन क्रमावार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते.
2) मांडणीतील त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते.
3) त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो.
चौरस संख्या : दिलेल्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी वर्गसंख्या ही चौरस संख्या असते. उदा. 1, 4, 9, 16, 25... या चौरस संख्या आहेत.
