चौथी शिष्यवृत्ती
विषय - मराठी
शब्दांच्या जाती - क्रियापद
"वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला 'क्रियापद' म्हणतात."
कोणत्याही वाक्यामध्ये कोणतीतरी क्रिया घडत असते. ती क्रिया दाखवणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद होय.
क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
उदाहरणे:
१. मुलगा आंबा खातो.
२. अनुराधा अभ्यास करते.
३. पक्षी आकाशात उडतात.
वरील वाक्यांमध्ये 'खातो', 'करते' आणि 'उडतात' हे शब्द क्रिया दाखवतात व वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. म्हणून हे शब्द क्रियापदे आहेत.
प्रश्न १. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा:
"सकाळी बागेत रंगीबेरंगी फुलपाखरे उडतात."
(१) सकाळी
(२) बागेत
(३) उडतात
(४) फुलपाखरे
उत्तर: (३) उडतात
प्रश्न २. योग्य क्रियापद वापरून वाक्य पूर्ण करा:
"मुलांनी नेहमी खरे ........."
(१) बोलावा
(२) बोलावे
(३) बोलतो
(४) बोलली
उत्तर: (२) बोलावे
