उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - सातवी
विभाग - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - वर्गीकरण 1 : शब्द
आपल्या आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये असलेले साम्य किंवा सुसंगती याच्या आधारे आपण त्या वस्तूंना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागतो. म्हणजेच आपण त्यांचे 'वर्गीकरण' करतो.
'वर्गीकरण' घटकातील प्रश्नात समान गुणधर्म व सारखेपणा असणाऱ्या बाबींचा एक गट दिलेला असतो. त्यांपैकी एक बाब इतर बार्वपिक्षा वेगळी असते व ती शोधायची असते. काही वेळेस पर्यायांमधील एक बाब प्रश्नात दिलेल्या गटाशी जुळते, असा पर्याय शोधायचा असतो.
वर्गीकरणावर आधारित प्रश्नांचे पुढील प्रकार आहेत
(1) शब्द
(2) आकृत्या
(3) संख्या
(4) वर्णमाला/अक्षरमाला.
या घटकातील प्रश्नांत चार शब्द, संख्या, आकृत्या किंवा इंग्रजी अक्षरे दिलेली असतात. यांपैकी तीन बाबींमधील साम्य ओळखून, चौथी बाब वेगळी करणे अपेक्षित असते.
वर्गीकरण 1: शब्द
ओळख : या उपघटकामध्ये चार शब्द दिलेले असतात. त्यांपैकी तीन शब्दांमध्ये समान गुणधर्म/साम्य असते, चौथा शब्द मात्र तो समान गुणधर्म दाखवत नाही. तो चौथा शब्द शोधायचा असतो.
महत्त्वाचे मुद्दे -
अवांतर वाचन करून तसेच शालेय विषयज्ञान, सामान्यज्ञान या आधारे आपली शब्दसंपदा वाढवा. या घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढील विषयांसंबंधित माहितीचा संग्रह करा :
(1) मराठी महिने, सण व ऋतू
(2) मुख्यदिशा व उपदिशा
(3) जलचर, भूचर, उभयचर, शाकाहारी व मांसाहारी प्राणी
(4) देश, राज्ये व राजधान्यांची शहरे
(5) चर्मवादये, तंतुवाद्ये व वायुवादये
(6) राशी, नक्षत्र, ग्रह व आकाशगंगा
(7) फळभाज्या व पालेभाज्या
(8) तीर्थक्षेत्रे, धार्मिक सण व राष्ट्रीय सण
(9) बैठे खेळ व मैदानी खेळ
(10) खेळ व खेळाडू
(11) नया व उपनद्या
(12) आठवड्याचे वार व महिने (मराठी-इंग्रजी)
(13) कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया व एकदल-द्विदल धान्ये
(14) अंडी देणारे- पिलांना जन्म देणारे पक्षी
(15) पाळीव प्राणी व जंगली प्राणी
(16) देश, खंड व महासागर
(17) धर्म, धर्मगुरु व संत
(18) लेखक व त्यांचे साहित्य इत्यादी.
