अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे
✅ विस्थापित शिक्षकांची बदली यादी EO/CEO लॉगिनवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, व संवर्ग 1, संवर्ग 2, बदली अधिकार प्राप्त, बदलीपात्र आणि विस्थापीत फेरीतील बदली झालेल्या शिक्षकांचे बदली आदेश CEO लॉगिनवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत सदर आदेश जिल्हास्तरावरून प्रकाशित करण्यात येतील.
✅ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्याकरिता प्रकाशित झालेल्या यादीमध्ये (ज्या संवर्ग एक ज्या शिक्षकांनी यापूर्वी होकार किंवा नकार दिलेला नाही) शिक्षकांची नावे आलेली असतील तर त्यांना पंचायत समिती स्तरावरून सूचना देऊन संबंधित शिक्षकांना आपली पुरावे कार्यालयास सादर करून नाव वगळण्यासंदर्भात संधी मिळेल किंवा पोर्टलवर नकाराची सुविधा उपलब्ध होईल.
वरील प्रक्रिया संपताच दिनांक 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्टला टप्पा क्रमांक सातच्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल.
✅ बदली प्रक्रिया 2025 मध्ये बदली प्रक्रियेतील शेवटचा टप्पा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्याची यादी यापूर्वीच प्रकाशित केलेली आहे परंतु या यादीमध्ये अद्यापही जे शिक्षक 30 जून 2025 ला 53 वर्षाचे झालेत असे काही शिक्षक या यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा शिक्षकांना टप्पा क्रमांक सात ची बदली प्रक्रिया करताना नकाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
✅ जेणेकरून असे शिक्षक अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या यादी मधून वगळले जातील शक्यतोवर त्यासंदर्भात पुरावे आपणास कार्यालयात सादर करावे लागतील.
✅ अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची यादी व अवघड क्षेत्रात बदली होणाऱ्या शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी जाहीर झाल्यानंतर लगेच पोर्टलवर सदर यादीतील शिक्षकांना आपला अवघड क्षेत्रातील शाळांचा प्राधान्यक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.
✅ ग्राम विकास विभागाच्या स्पष्टीकरणानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याची असल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांना दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रातील रुजू दिनांकानुसार वास्तव सेवा जेष्ठतेने बदल्या करण्यात येतील (18 जून 2024 चा शासन निर्णय मुद्दा क्रमांक 1.10 वाचावा.)
✅ सदर बदली प्रक्रियेमध्ये सद्यस्थितीत चालू असलेल्या बदली प्रक्रियेतील कोणतेही संवर्गातून बदली झालेल्या शिक्षकांचा समावेश होणार नाही.
✅ ज्या शिक्षकांनी या बदली प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बदली निवडलेली असून त्यांची बदली झालेली नाही अशा शिक्षकाचा समावेश अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरताना करण्यात येईल.
✅ पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत बदली घेतलेल्या शिक्षकांचा समावेश (उभयता दोघांचाही) या बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही.