नवोदय परीक्षा - पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया

 पूर्ण संख्यांवरील चार मुलभूत क्रिया


 गणित विषयामध्ये चार मुलभूत क्रियांना विशेष स्थान आहे. या चार प्राथमिक क्रियांवरच गणिताच्या इतर संकल्पना वा किया करता येतात. या चार किया म्हणजे

१) बेरीज

२)वजाबाकी

३) गुणाकार

४) भागाकार


सूत्र : भाज्य =  भाजक भागाकार + बाकी

विभाज्यतेच्या कसोट्या :

* 2 ची कसोटी - ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, वा 8 यापैकी एक अंक असतो त्या संख्येला 2 ने नि:शेष भाग जातो. उदा . 108. 74, 96 इ..

* 3 ची कसोटी - दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने नि:शेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने नि:शेष भाग जातो. उदा. 27, 321, 450 इ.

* 4 ची कसोटी - ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानावरील अंकाचे स्थान न बदलता तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निःशेष भाग जात असल्यास किंवा ज्या संख्येच्या एकक व दशकस्थानी 0 अंक असतो. त्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जातो. उदा. 700, 528, 468 इ.

* 5 ची कसोटी- ज्या संख्येचे एकक स्थानी 0 वा 5 यापैकी एक अंक असतो त्या संख्येला 5 जे निःशेष भाग जातो. उदा. 225, 90, 75 इ..

* 6 ची कसोटी- ज्या संख्येला 2 व 3 ने नि:शेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो. उदा. 216, 312, 528 इ.

* 8 ची कसोटी- ज्या संख्येच्या शतक, दशक व एकक स्थानावरील अंकाचे स्थान न बदलता तयार होणाऱ्या संख्येला 8 ने नि:शेष भाग जात असल्यास त्या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो किंवा शेवटी सलग तीन 0 असल्यास त्या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जातो.उदा. 1000, 4012, 3664, 2192 इ.

* 9 ची कसोटी- दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने निःशेष भाग जातो. उदा. 630, 27, 321 इ.

* 10 ची कसोटी- ज्या संख्येचे एकक स्थानी 0 अंक असतो त्या संख्येला 10 ने निःशेष भाग जातो. उदा. 90, 710 , 220 इ.

* 11 ची कसोटी- संख्येतील एकाआड एक अंकांच्या बेरजेतील फरक 0 वा 11 ने विभाज्य असेल तर त्या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो. उदा. 5764, 87846 इ.

* 12 ची कसोटी- ज्या संख्येला 3 व 4 ने नि:शेष भाग जातो त्या संख्येला 12 ने निःशेष भाग जातो. उदा. 900, 528, 1020 इ.

पदावली : पदावली सोडवताना (कंचे भागुबेव) म्हणजे कंस, चा वा चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हा क्रम लक्षात ठेवावा. पदावलीमध्ये अनेक कंस असतील तर प्रथम आतील कंस सोडवणे. भागाकार व गुणाकार असेल तर प्रथम येणारी क्रिया करावी तसेच बेरीज व वजाबाकी असेल तर जी क्रिया प्रथम असेल ती करावी.

सरासरी : एका वस्तूची वाटणी सर्वांत समान करावयाची असेल तर प्रत्येकाच्या वाट्यास येणारी वस्तू दर्शविणारी संख्या म्हणजे सरासरी. 

सूत्र : 

सरासरी = सर्व संख्यांची बेरीज ÷ एकूण संख्या

संख्यांची बेरीज = सरासरी  × एकूण संख्या.

#नवोदय परीक्षा 2026

#Navodaya Exam 2026

या घटकाशी निगडित खाली विभाज्यतेच्या कसोट्या व पदावली वर आधारित टेस्ट दिली आहे ती Click Here बटणावर क्लिक करून सोडवा.




Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post