पाचवी शिष्यवृत्ती गणित नफा - तोटा | Navodaya Scholarship exam Profit - Loss

       

पाचवी शिष्यवृत्ती / नवोदय

गणित

नफा - तोटा




महत्वाचे संबोध -

1. खरेदी किंमत - ज्या किंमतीमध्ये वस्तूची खरेदी केली, त्या किंमतीस त्या वस्तूची खरेदी किंमत असे म्हणतात.

2. एकूण खरेदी किंमत - विक्रीचा व्यवहार करताना एखादी वस्तूची विक्री करण्यापूर्वी तिच्यासाठी करावा लागणारा सर्व खर्च मूळ खरेदी किंमतीत मिळवून मिळणाऱ्या रकमेस एकूण खरेदी किंमत असे म्हणतात.

3. विक्री किंमत - ज्या किंमतीमध्ये वस्तूची विक्री केली, त्या किंमतीस त्या वस्तूची विक्री किंमत असे म्हणतात. या

4.नफा - वस्तूच्या खरेदी किंमतीपेक्षा जर वस्तूची विक्री किंमत जास्त असेल तर नफा झाला असे म्हणतात.

5. तोटा - वस्तूच्या विक्री किंमतीपेक्षा जर वस्तूची खरेदी किंमत जास्त असेल तर तोटा झाला असे म्हणतात.

लक्षात ठेवा -
1. फायद्याला नफा तर नुकसानीस तोटा असे म्हणतात.

2. वाहतूक, जकात, भाडे, दुरूस्ती, नुतनीकरण, हमाली इ. करिता जी जादा रक्कम द्यावी लागते त्याचा समावेश मूळ खरेदी किंमतीमध्येच करावा व या‌द्वारे मिळणारी एकूण खरेदी किंमत विचारात घ्यावी.

3. नफा किंवा तोटा यांची शेकडेवारी ठरवताना त्यांची तुलना खरेदी किंमतीशी करतात.

 सूत्रे-

1. नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
2. तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत
3. खरेदी किंमत = विक्री किंमत - नफा
4.खरेदी किंमत = विक्री किंमत + तोटा

5. विक्री किंमत = खरेदी किंमत + नफा

6. विक्री किंमत = खरेदी किंमत - तोटा
7. शेकडा नफा = (नफा ÷ खरेदी किंमत) × 100  

8. शेकडा तोटा = (तोटा ÷ खरेदी किंमत) × 100

9. एकूण खरेदी किंमत = मूळ खरेदी किंमत + त्या वस्तूंवरील इतर सर्व खर्च

वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.


या घटकावर ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा 



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post