शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी - मराठी - शब्दांच्या जाती - नाम

 

चौथी शिष्यवृत्ती 
विषय - मराठी 
शब्दांच्या जाती - नाम 




नामाची व्याख्या - 

प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या कोणत्याही वस्तूला, माणसाला, प्राण्याला किंवा त्यांच्या गुणांना जे नाव दिलेले असते, त्याला 'नाम' असे म्हणतात.

(थोडक्यात सांगायचे तर, कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या किंवा जागेच्या नावाला 'नाम' म्हणतात.)

नामाचे प्रकार आणि उदाहरणे - 

  • व्यक्तींची नावे: राहुल, आनंद, मीरा, शिक्षक, मुलगा.

  • प्राण्यांची/पक्ष्यांची नावे: वाघ, गाय, सिंह, पोपट, चिमणी.

  • वस्तूंची नावे: वही, पेन, टेबल, फळा, चेंडू.

  • ठिकाणांची/जागांची नावे: शाळा, गाव, पुणे, नदी, पर्वत.

  • काल्पनिक किंवा गुणांची नावे: परी, आनंद, हुशारी, गोडवा, श्रीमंती.


परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात, याचे नमुने:

प्रश्न १. खालील वाक्यातील 'नाम' ओळखा:

“गोपाळ हुशार मुलगा आहे.”

उत्तर: गोपाळ, मुलगा

प्रश्न २. खालील पर्यायातून नाम नसलेला शब्द ओळखा:
१) आंबा
२) सुंदर
३) गुलाब
४) हिमालय

उत्तर: २) सुंदर (कारण 'सुंदर' हे विशेषण आहे, नाम नाही.)


शिष्यवृत्ती परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आमच्या व्हाट्सअप समूह आताच जॉईन करा. ⤵️


शिष्यवृत्ती परीक्षा तयारी २०२


सदर घटकाचा अभ्यास करून चाचणी सोडवल्यास आपल्याला घटक कितपत समजला हे समजेल.

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم