प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा | इयत्ता - चौथी | विभाग - मराठी | घटक - आकलन | उपघटक - कविता व त्यावर आधारित प्रश्न

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
विभाग - मराठी
 घटक - आकलन
उपघटक - कविता व त्यावर आधारित प्रश्न 


कविता प्रथम वाचून घ्यावी. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. कवितेचा आशय नीट समजून घेऊन कवितेचा अर्थ जाणून घ्यावा. विद्यार्थ्यांनी ही कविता शांतपणे व एकाग्रतेने वाचावी. कवितेच्या खाली असणाऱ्या प्रश्नांचे सर्व पर्याय नीट वाचावेत.

  • कविता लक्षपूर्वक वाचा.
  • कवितेचा आशय समजून अर्थ जाणून घ्या.
  • कवितेवर आधारित प्रश्न नीट वाचा.
  • सर्व पर्याय तपासून पाहा.
  • योग्य उत्तराचा पर्याय शोधताना चारही पर्याय बारकाईने वाचा.
  • पहिला पर्याय वाचून घाईने उत्तर नोंदवू नका.


नमुना कविता

  • खालील कविता काळजीपूर्वक वाचा. कविता समजून घेऊन त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधून अचूक पर्याय नोंदवा.

सर्कस होती झकपक । बावळट त्यात विदूषक। मात्र त्याने केली कमाल। उडवून दिली भलतीच धमाल । उंचावरून मारली उडी । सर्वांच्यावर केली कडी।

काय पण होते रंगीत ध्यान। जिकडे तिकडे लुडबूड छान।

सगळ्यांशी त्याची झटपट । टपल्या मारल्या फटाफट । डोळे असे मिचकावले । वेडावून छान दाखवले।

नाकावर त्याने ठेवले बोट । हसून-हसून दुखले पोट।

प्र. १) कवितेत कोणाचे वर्णन केले आहे?

1) कलाकारांचे

2) सर्कशीचे

3) विदूषकाचे

4) लोकांचे

उत्तर : पर्याय 3


प्र.२)  कवितेतील विदूषकाने सर्कशीत खालीलपैकी कोणती कृती केली नाही?

1) उंचावरून उडी मारणे

2) सायकलवरून फेरी मारणे

3) डोळे मिचकावणे

4) नाकावर बोट ठेवणे

उत्तर : पर्याय 2


प्र.३) 'हसून-हसून पोट दुखणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
1) पोट दुखणे

2) मजा वाटणे

3) पोट दुखेपर्यंत हसणे

4) खूप हसणे

उत्तर : पर्याय 4



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post