प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - संख्याज्ञान उपघटक - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या | 4th scholarship Maths Mothyat mothi v lahanat lahan sankhya

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
विभाग - गणित
 घटक - संख्याज्ञान
उपघटक - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या



हसत खेळत शिक्षण


मोठ्यात मोठी संख्या बनविताना संख्येतील अंकांचा उतरता क्रम लावावा. उदा. 2,4,5,1,3 पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या = 54321 (अंकांचा उतरता क्रम)

लहानात लहान संख्या बनविताना संख्येतील अंकांचा चढता क्रम लावावा. उदा. 2,4,5,1,3 पाच अंकी लहानात लहान संख्या = 12345 (अंकांचा चढता क्रम).

लहानात लहान संख्या बनविताना जर दिलेल्या अंकांमध्ये 0 असेल तर अंकाचा चढता क्रम लावताना शून्य हे सुरुवातीला न घेता दुसऱ्या स्थानावर असावे.

उदा. 2,4,5,1,3,0 सहा अंकी लहानात लहान संख्या = 102345 (अंकांचा चढता क्रम व शून्य दुसऱ्या स्थानावर)

काही वेळा अंक कमी असतात. त्यावेळी अंकांची पुनरावृत्ती करावी लागते.

लहानात लहान संख्या बनविताना लहान अंकांची पुनरावृत्ती करावी.

उदा. 2,4,5,1,3 सहा अंकी लहानात लहान संख्या = 112345 (अंकांचा चढता क्रम व लहान अंकांची पुनरावृत्ती केली )

विशिष्ट अंकी सर्वांत मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 हा असतो. उदा. 9999999

विशिष्ट अंकी सर्वात लहान संख्येत प्रत्येक डावीकडील पहिला अंक 1 हा असतो. पुढील सर्व अंक 0 असतात. 
उदा. 10000

एक अंकी लहानात लहान = 1

दोन अंकी लहानात लहान = 10

तीन अंकी लहानात लहान = 100

चार अंकी लहानात लहान = 1000

पाच अंकी लहानात लहान = 10000

सहा अंकी लहानात लहान = 100000

सात अंकी लहानात लहान = 1000000

आठ अंकी लहानात लहान = 10000000

एक अंकी मोठ्यात मोठी = 9

दोन अंकी मोठ्यात मोठी = 99

तीन अंकी मोठ्यात मोठी = 999

चार अंकी मोठ्यात मोठी = 9999

पाच अंकी मोठ्यात मोठी = 99999

सहा अंकी मोठ्यात मोठी = 999999

सात अंकी मोठ्यात मोठी = 9999999

आठ अंकी मोठ्यात मोठी = 99999999


नमुना प्रश्न

प्र. 1) 9,5,3,4,0,2 हे अंक वापरुन तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता ?

1) 3

2) 4

3)0

4) 2 

स्पष्टीकरण : वरील अंक वापरून मोठ्यात मोठी 954320 ही तयार होत आहे. यातील शतक स्थानचा अंक 3 हा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.


1 تعليقات

Thanks

إرسال تعليق
أحدث أقدم