प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - गणित
घटक - संख्यज्ञान
उपघटक - संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम, तुलना
तुलना : संख्यांचा लहान-मोठेपणा ठरविणे म्हणजे संख्यांची तुलना करणे होय. तुलना करण्यासाठी <, >, = ही चिन्हे वापरतात.
चिन्हांचा अर्थ
1) < च्यापेक्षा मोठा
2) > च्यापेक्षा लहान
3) = समान
चढता क्रम : दिलेल्या संख्यांची लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत चढत्या क्रमाने मांडणी केली जाते. त्या मांडणीला 'चढता क्रम' म्हणतात.
उतरता क्रम : दिलेल्या संख्यांची मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत उतरत्या क्रमाने मांडणी केली जाते. त्या मांडणीला 'उतरता क्रम' म्हणतात.
उदा. 1) सर्व संख्या समान असल्यास डावीकडील अंकाची तुलना करतात. 87678, 72345, 54321, 67546 या मांडणीत डावीकडील अंकास Underline केली आहे.
5< 6<7<8 म्हणून चढता क्रम = 54321, 67546, 72345, 87678
8 > 7 > 6 > 5 म्हणून उतरता क्रम 87678, 72345, 67546, 54321
2) डावीकडचे पहिले दोन अंक समान असल्यास डावीकडून दुसऱ्या अंकाची तुलना करावी. दुसराही अंक समान असल्यास तिसऱ्या अंकाची तुलना करावी. याप्रमाणे क्रमाक्रमाने पुढील अंकाची तुलना करून लहान मोठेपणा ठरवावा.
789427,789345, 789123, 789543 या याचा चढता व उतरता क्रम लावा.
डावीकडील पहिले तीन समान असल्यामुळे चौथ्या अंकांची तुलना
1<3 < 4 < 5 म्हणून चढता क्रम 789123, 789345, 789427, 789543
5 4 3 1 म्हणून उतरता क्रम = 789543, 789427, 789345, 789123