शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ : 'अंतिम उत्तरसूची' (Final Answer Key) प्रसिद्ध !!!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व संचनिहाय अंतिम उत्तरसूची (Final Answer Key) परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📍 महत्त्वाचे मुद्दे :
✅ अंतिम उत्तरसूची : १० मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या 'अंतरिम' उत्तरसूचीवरील आक्षेपांची विषय तज्ज्ञांमार्फत पडताळणी करून ही उत्तरसूची सुधारित (Final) करण्यात आली आहे.
✅ निकाल प्रक्रिया : या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
✅ सूचना :या उत्तरसूचीतील उत्तरे *अंतिम* असून, यापुढे यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार किंवा आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.
🌐 येथे पहा आपली अंतिम उत्तरसूची :
👉

.png)