प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - गणित
घटक - कोन व त्यांचे प्रकार
१) प्रत्येक कोनाला एक शिरोबिंदू असतो.
२) कोनाला दोन भूजा असतात.
३) कोन हा दोन किरणांनी मिळून तयार होतो. या दोन किरणांना एक सामाईक अंत्यबिंदू असतो.
४) प्रत्येक कोनाचे एक माप असते. ( हे माप 0° व १८० ° यांच्या दरम्यान असते.)
५) लघुकोनाचे माप 90⁰ पेक्षा कमी असते, काटकोनाचे माप 90⁰ व विशाल कोनाचे माप 90⁰ पेक्षा जास्त असते.