प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - बुद्धिमत्ता
घटक - शब्दसंग्रह
'वर्गीकरण' या विभागातील प्रश्नांमध्ये चार पर्याय दिलेले असतात. या चार पर्यायांमध्ये कोणत्याही तीन पर्यायांमध्ये एका बाबतीत साम्य असते. म्हणून त्या तीन पर्यायांचा एक गट तयार होते. म्हणून विद्यार्थ्यांनी गटात न बसणाऱ्या चौथ्या पर्यायाचा शोध घ्यायचा असतो. खालील तीन घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात,
१) शब्दसंग्रह
२) संख्या
३) आकृती
उपघटक : १ शब्दसंग्रह
शब्दसंग्रह या घटकांमध्ये पाठ्यपुस्तकातील शब्दसंग्रह लक्षपूर्वक वाचाचे, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, पक्षी, फुले, फळे, पिके, रंग, पदार्थ व लिंग या गोष्टींबर प्रश्न विचारले जातात.
नमुना प्रश्न
प्र.1 ते 2 साठी सूचना : खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा.
प्र.1
1) जानेवारी
2) मार्च
3) डिसेंबर
4) एप्रिल
स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील पर्यायामध्ये जानेवारी, मार्च व डिसेंबर हे महिने ३१ दिवसांचे व एप्रिल हा महिना ३० दिवसाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.
प्र.2
1) वांगे
2) पेरु
3) सीताफळ
4) जांभूळ
स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील पर्यायांमध्ये पेरू, सीताफळ व जांभूळ ही फळे आहेत व वांगे ही भाजी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.
