प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - मराठी
घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे या उपघटकात काही शब्द असे आहेत की, त्यांचे एकापेक्षा जास्त अर्थ आहेत. चाक्यातील बापरावरून त्याचे अर्थ ठरत असतात.
०१. जागा - ठिकाण, जागृत
०२. पार - मर्यादा, वडाचा पार, पलीकडे
०३. वजन - प्रतिष्ठा, तराजूत घालण्याचे माप
०४. चाल - पद्धती, हल्ला, गती
०५. कळ - गुप्त किल्ली, वेदना, भांडणाचे कारण
०६. गज - हत्ती, खिडकीची सळई
०७. तीर - बाण, काठ
०८. मित्र - सूर्य, दोस्त
०९. अंग - शरीर, देह
१०. मान - गळा, आदर, मोठेपणा, शरीराचा एक भाग
११. विभूती - अंगारा, थोरपुरुष, भस्म, श्रेष्ठ
१२. चिरंजीव - मुलगा, कायम टिकणारा
१३. चरण - कवितेची ओळ, पाय
१४. विषय - पैसा, प्रदेश, शिकण्याचा एखादा विषय
१५. पत्र - चिठ्ठी, लेखी मजकूर
१६. पक्ष - पंधरवडा, बाजू, पंख
१७. पूर - पाण्याचा पूर, नगर
२८. वार - दिवस, घाव
२९. पाट - बसायचा पाट, पाण्याचा पाट
३०. वाणी - बोलणे, व्यापारी
३१. कर्ण - कान, कुंतीपुत्र
३२. दंड - शरीराचा एक भाग, काठी, शिक्षा
३३. वर - आशीर्वाद, पती, श्रेष्ठ
३४. अभंग - न भंगलेले, काव्याचा एक प्रकार
३५. कर - हात, किरण, एक क्रियापद
३६. अक्षर - पूर्ण उच्चाराणा वर्ण, शाश्वत
३७. खल - दुष्ट, कुटण्याचे साधन, गुप्तचर्चा
३८. गोम - खुबी, अनेक पायांचा एक किडा
३९. धड - न फाटलेले, मानेखालचा शरीराचा भाग
४०. माळ - ओसाड जमीन, फुलांची माळ
४१. काच - पारदर्शक पदार्थ
४२. काम - कर्तव्य, इच्छा
४३. शिळा - मोठा दगड, शिळा पदार्थ
४४. जीवन - आयुष्य, पाणी
४५. सूत - सारथी, धागा
४६. ऋण - उपकार, कर्ज, वजाबाकीचे चिन्ह
४७. उत्तर- प्रश्नाचे उत्तर, दिशेचे नाव
४८. द्विज - पक्षी, ब्राह्मण
४९. माया - ममता, धन
५०. अंक - मासिकाचा अंक, आकडा (संख्या), मांडी
५१. खडा - लहानसा दगड, उभा
५२. तट - किल्ल्याची भिंत, कडा, किनारा
५३. कासार - तलाव, बांगड्या भरणारा
५४. गुण - चांगल्या सवयी, दोरी
५५. वात - वारा, दिव्यातील वात
५६. मात्रा - औषधी गोळी, बाराखडीतील चिन्ह उपाय
५७. अंबर - आकाश, वस्त्र
५८. भाव - भक्ती, किंमत, भावना
५९. सुमन -पवित्र, मन, फूल
६०. अनंत - अमर्याद, परमेश्वर
६१. ओढा - पाण्याचा लहान ओघ, मनाचा कर
६२. अर्थ - आशय, पैसा
६३. पक्ष - पंख, बाजू, पंधरवडा
६४. पय - पाणी, दूध
६५. घाट - नदीच्या पायऱ्या, आकार, डोंगरातील रस्ता
