प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - गणित घटक - नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या

 

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - सातवी
विभाग - गणित
 घटक - नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या 




संख्याच्या 1, 2, 3, 4.... या समूहातील संख्याना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या
म्हणतात
शून्य या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्याच्या समूहात करून मिळणा-या 0.1.2.3.4. या संख्याच्या समूहास पूर्ण संख्या म्हणतात
कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्याच्या, एकक, दशक व शतक, अशा स्थानांवरून ठरते
एखादया संख्येतील एकक व दशक स्थानांच्या अंकांची अदलाबदल केली असता, तयार होणारी संख्या व मूळ संख्या यांमधील फरक 9 च्या पटीत असतो व 9 ची पट त्या अकांमधील फरकाची असते.
एखादया संख्येत शतक व एकक स्थानी तोच अंक असेल, तर त्याच्या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्या अंकाच्या (100-1) = 99 पटीइतका असतो.
विशिष्ट अंकी मोठ्यांत मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 हा असतो.
लहानात लहान संख्येच्या डावीकडून पहिला अंक 1 हा असतो
दोन किंवा तीनच अंक दिलेले असताना चार / पाच अंकी मोठ्यात मोठी अथवा लहानात
लहान संख्या तयार करणे अशा प्रकारची मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक, उतरत्या क्रमाने लिहिताना सर्वात मोठा अंक जास्तीत जास्त वेळा लिहाया उदा 850 हया अंकापासून बनणारी अशी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या = 88850
अशा प्रकारची लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक चढत्या क्रमाने
लिहिताना
सर्वांत छोटा अंक जास्तीत जास्त वेळा लिहावा
उदा. 923 22239





3 Comments

Thanks

  1. मी चौथी ची विद्यार्थी आहे

    ReplyDelete
  2. मी ही इयत्ता चौथीत आहे.

    ReplyDelete
  3. मी ही इयत्ता चौथीत आहे.

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post