उन्हाळी सुट्टी - इंग्रजीसोबत गट्टी
ऑनलाईन टेस्ट क्र. 5
Domestic / Pet Animals (पाळीव प्राणी)
उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत असतानाच आपले इंग्रजी विषयाचे ज्ञान वाढवण्यासाठी आपण 'इंग्रजीसोबत गट्टी' ही विशेष ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आज आपण या सिरीजमधील पाचवी टेस्ट पाहणार आहोत.
आजच्या टेस्टचा विषय आहे - Domestic / Pet Animals (पाळीव प्राणी). आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या प्राण्यांना इंग्रजीत काय म्हणतात, त्यांचे स्पेलिंग काय आहेत, हे या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळेल.
या टेस्टची वैशिष्ट्ये:
सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
सोपे आणि आकर्षक प्रश्न.
टेस्ट सबमिट केल्यावर लगेच गुण (Score) पाहता येईल.
चुकीच्या उत्तरांचे योग्य स्पष्टीकरण समजेल.
चला तर मग, टेस्ट सोडवूया!
आज आपण काय शिकणार आहोत? (Domestic Animals Vocabulary)
टेस्ट सोडवण्यापूर्वी खालील शब्दांची उजळणी नक्की करा:
- Cow - गाय
- Buffalo - म्हैस
- Goat - शेळी
- Sheep - मेंढी
- Horse - घोडा
- Donkey - गाढव
- Dog - कुत्रा
- Cat - मांजर
- Rabbit - ससा
- Ox - बैल
मनुष्य आणि प्राणी यांचा संबंध प्राचीन काळापासून आहे. जे प्राणी मनुष्यासाठी उपयोगी आहेत व हिंसक नसून त्यांना आपण सहजपणे पाळू शकतो अशा प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणतात. कुत्रा, मांजर, गाय, बकरी, घोडा, म्हैस यासारखे प्राणी मनुष्य पाळतो आणि हे प्राणी वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात. जसे कि गाय, म्हैस यांच्यापासून आपल्याला दुध मिळते. तसेच घोडा आणि मेंढी हे पाळीव प्राणी आर्थिक दृष्ट्या खूप फायदेशीर असतात. मेंढी पासून आपल्याला लोकर मिळते तर घोड्याचा वापर प्राचीन काळापासून वस्तूंची ने - आण करण्यासाठी होतो. उंट आणि गाढव यांचा वापर आझे वाहून नेण्यासाठी होतो. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे आणि घराच्या सुरक्षेसाठी तो पाळला जातो. बैलाचा वापर शेत कामासाठी होतो असे हे पाळीव प्राणी मनुष्यासाठी खूप उपयोगी ठरतात.
विद्यार्थी मित्रांनो पाळीव प्राण्यांची मराठी नावे तुम्हाला माहिती असतील तसेच त्यांची इंग्रजी नावे माहिती असणे सुद्धा आवश्यक आहे. चला तर खालील चाचणी सोडून आपण त्यांची इंग्रजी नावे अभ्यासूयात.

Thanks ❤️🩹
ReplyDeleteThanks 🙏
DeletePunam Rajkumar Mauje
ReplyDelete