इयत्ता चौथी शिष्यवृत्ती विषय - मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द (Shabdsamuhabaddal ek Shabd )

 

इयत्ता सातवी शिष्यवृत्ती

विषय - मराठी

शब्दसमूहाबद्दल एक शब्द 

(Shabdsamuhabaddal ek Shabd )






मराठी विषयातील 'शब्दसमूहाबद्दल एक शब्द' हा अतिशय महत्त्वाचा आणि हमखास गुण मिळवून देणारा घटक आहे.

  • गावाच्या न्याय निवाड्याची जागा  -   चावडी
  • तांब्याच्या पत्र्यावर लिहीलेला लेख  -  ताम्रलेख
  • आठवड्याला प्रसिध्द होणारे   -  साप्ताहिक
  • तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे - त्रैमासिक
  • दोनदा जन्मलेला  -  व्दिज
  • बाराजणांचा कारभार  -  बारभाई
  • राजाची स्तुती करणारा  -  भाट
  • मृत्यूवर विजय मिळणारा  -  मृत्यूंजय
  • वाडवडिलांपासून मिळालेले  -  वडिलोपार्जित
  • वर्षाने प्रसिध्द होणारे  -  वार्षिक
  • जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री  -  विधवा
  • कायम टिकणारे  -  शाश्वत

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post