इयत्ता सातवी शिष्यवृत्ती
विषय - मराठी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
(Shabdsamuhabaddal ek Shabd )
मराठी विषयातील 'शब्दसमूहाबद्दल एक शब्द' हा अतिशय महत्त्वाचा आणि हमखास गुण मिळवून देणारा घटक आहे.
- गावाच्या न्याय निवाड्याची जागा - चावडी
- तांब्याच्या पत्र्यावर लिहीलेला लेख - ताम्रलेख
- आठवड्याला प्रसिध्द होणारे - साप्ताहिक
- तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे - त्रैमासिक
- दोनदा जन्मलेला - व्दिज
- बाराजणांचा कारभार - बारभाई
- राजाची स्तुती करणारा - भाट
- मृत्यूवर विजय मिळणारा - मृत्यूंजय
- वाडवडिलांपासून मिळालेले - वडिलोपार्जित
- वर्षाने प्रसिध्द होणारे - वार्षिक
- जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री - विधवा
- कायम टिकणारे - शाश्वत
