प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - बुद्धिमत्ता घटक : वर्गीकरण उपघटक : 1 शब्दसंग्रह

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
 विभाग - बुद्धिमत्ता 
  घटक  : वर्गीकरण 

उपघटक : 1 शब्दसंग्रह 



 

वर्गीकरण' या विभागातील प्रश्नांमध्ये चार पर्याय दिलेले असतात. या चार पर्यायांमध्ये कोणत्याही तीन पर्यायांमध्ये एका बाबतीत साम्य असते. म्हणून त्या तीन र्यायांचा एक गट तयार होते. म्हणून विद्यार्थ्यांनी गटात न बसणाऱ्या चौथ्या पर्यायाचा शोध घ्यायचा असतो.

खालील चार घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

1) शब्दसंग्रह

2) आकृती

3) संख्या

4) इंग्रजी अक्षरमाला



उपघटक : 1 शब्दसंग्रह


शब्दसंग्रह या घटकांमध्ये पाठ्यपुस्तकातील शब्दसंग्रह लक्षपूर्वक वाचावे. पाळीव जंगली प्राणी, पक्षी, फुले, फळे, पिके, रंग, पदार्थ व लिंग या गोष्टींवर प्रश्न विचारले जातात.

नमुना प्रश्न •

प्र.1 व 2 साठी सूचना: खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा.

प्र.1)

1) जानेवारी

2) मार्च

3) डिसेंबर

4) एप्रिल

स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील पर्यायामध्ये जानेवारी, मार्च व डिसेंबर हे महिने 31 दिवसांचे व एप्रिल हा महिना 30 दिवसाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.



प्र.2)

1) वांगे

2) पेरु

3) सीताफळ

4) जांभूळ

स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील पर्यायांमध्ये पेरू, सीताफळ व जांभूळ ही फळे आहेत व वांगे ही भाजी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.


Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم