प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - बुद्धिमत्ता चाचणी घटक - वर्गीकरण भाग 4 उपघटक - इंग्रजी अक्षरमाला

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - चौथी 

 विभाग - बुद्धिमत्ता चाचणी

  घटक - वर्गीकरण भाग 4 

उपघटक - इंग्रजी अक्षरमाला 




या भागावरील प्रश्नांचे स्वरूप नावावरूनच समजते, अशा प्रकारच्या प्रश्नात चार विविध गट दिलेले असतात, त्यापैकी तीन गट एका विशिष्ट नियमाने बनलेले असतात मात्र चौथा गट वेगळ्याच प्रकारे बनलेला असतो, तो गट

शोधणे व पर्यायातून निवडणे. काही वेळा एखादी सलग क्रमवार अक्षरमाला / विविध अक्षरगटांची मालिका दिलेली असते व त्या मालिकेत एखादे पद / गट वेगळ्याच क्रमाने आल्याने विसंगत असते ते शोधणे असे प्रश्नाचे सर्वसाधारण स्वरूप असते.

विसंगत घटक शोधत असताना पदांमधील एक सारखेपणा, (साधम्र्य) शोधण्यासाठी विविध आधार वापरता येतील.

वर्ण मालेतील मुळाक्षरांचा क्रम वापरून बनलेले गट

* A पासुन Z पर्यंत सुलट क्रमाने

* Z कडुन A कडे ऊलट क्रमाने

* 1, 2, 3 इ. अक्षरे वगळून (चढत्या क्रमाने वगळणे)

* प्रत्येकी 2; किंवा 3, किंया 4 इ. वगळून (समान वगळणे)

* 4, 3, 2, इ. क्रमाने अक्षरे वगळून (उतरत्या क्रमाने)


विसंगत घटक शोधताना, घाईत वेळ वाचविण्यासाठी एक पहिला गट पाहून त्यानुसार लगेचच येणारा विसंगत आढळल्यास तो विसंगत समजण्याची चूक करू नये.

विसंगत घटक सापडण्यासाठी दिलेल्या गटांपैकी किमान दोन गटात साधर्म्य असलेच पाहिजे हे लक्षात असू द्या.



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post