उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - गणित घटक - सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या व रोमन संख्याचिन्हे

 

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - सातवी 

विभाग - गणित 

 घटक - सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या व रोमन संख्याचिन्हे






सम संख्या :

1) ज्या संख्येला '2' ने निःशेष भाग जातो, तिला 'सम संख्या' म्हणतात. सम संख्या 2 च्या पटीत असतात.

2) सम संख्येच्या एकक स्थानी 0.2,4.6 आणि 8 यांपैकी एक अंक असतो.

3) '0' ही समसंख्या आहे.

4) क्रमाने लगत असणाऱ्या दोन सम संख्यांमधील अंतर '2' असते. उदा. 30, 32, 34, 36.

5) सम संख्येला सम संख्येने गुणले तर गुणाकार सम संख्याच असतो. उदा. 14 * 4 = 56

6) सम संख्येमध्ये सम संख्या मिळवली अथवा वजा केली असता उत्तर सम संख्याच मिळते. उदा. 12 + 14 = 26

26-10 =16

7) x ही एक समसंख्या असेल, तर खालील संख्या सम संख्या आहेत. उदा. x + 2, x + 8,  x - 4,  x - 12,  2x, 3x

विषम संख्या :

1) ज्या संख्येला 2 ने निःशेष भाग जात नाही, तिला 'विषम संख्या' म्हणतात. सम नसणाऱ्या संख्येला विषम संख्या म्हणतात.

2) विषम संख्येच्या एकक स्थानी 1,3,5,7 आणि 9 यांपैकी एक अंक असतो.

3) क्रमाने लगत असणाऱ्या दोन विषम संख्यांमधील अंतर '2' असते. उदा. 67, 69, 71, 73.....

4) विषम संख्येला विषम संख्येने गुणले तर गुणाकार विषम संख्या असतो. उदा. 9 * 5 = 45

40-11-29

सम संख्येत विषम संख्या मिळवली अथवा वजा केली असता उत्तर विषम संख्याच मिळते. 5) उदा. 12+11=23,

6) x ही एक विषम संख्या असेल तर पुढील संख्या विषम संख्या आहेत. उदा. x + 2, x - 2,  x + 10,  3x, 7x


नैसर्गिक संख्या :

1, 2, 3....... या संख्यांना 'नैसर्गिक संख्या' म्हणतात. वस्तू मोजण्यासाठी या संख्यांचा उपयोग होतो. म्हणून या संख्यांना 'मोज संख्या' असेही म्हणतात.

2) सर्वांत लहान नैसर्गिक संख्या '1' आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. कारण नैसर्गिक संख्या अनंत आहेत

3) नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या येते. उदा. 15+14=29

4) नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्या येते. उदा. 8 * 7 = 56

मूळ संख्या :

ज्या संख्येला केवळ दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.
1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत.
2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे.

संयुक्त संख्या :
ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला संयुक्त संख्या म्हणतात.
1 ते 100 दरम्यान 74 मूळ संख्या आहेत.
सर्वात लहान संयुक्त संख्या 4 ही आहे.

जोडमूळ संख्या:

दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात.
1 ते 100 दरम्यान जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आढळतात.
जसे : 3 व 5, 5 व 7, 11 व 13 इ.

सहमूळ संख्या :

ज्या दोन संख्येला केवळ 1 हा एकच सामायिक विभाजक असतो त्यास सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात.
जसे : 15 व 16 या दोन्ही संख्येचा सामायिक विभाजक 1 हा आहे त्यामुळे ही सहमूळ संख्येची जोडी आहे.



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post