प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - इंग्रजी
घटक : सम - विषम संख्या
सम संख्या: ज्या संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 अंक असतात त्या संख्येला 'सम संख्या' म्हणतात. सम संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो.
1) 1 ते 100 मध्ये सम संख्या 50 व 10 ते 99 मध्ये सम संख्या 45
2) समसंख्येत 2 मिळविल्यास पुढील सम संख्या मिळते.
3) समसंख्येत 1 मिळविल्यास पुढील विषम संख्या मिळते.
उदा. 230, 542, 234, 456, 328
विषम संख्या : ज्या संख्येच्या एककस्थानी 1,3,5,7,9 अंक असतात. त्या संख्येला विषम संख्या
अंकी 90
ते म्हणतात. 1) 1 ते 100 मध्ये विषम संख्या 50 व 10 ते 99 मध्ये विषम संख्या 45
2) विषमसंख्येत 2 मिळविल्यास क्रमाने पुढील विषम संख्या मिळते.
3) विषम संख्येत 1 मिळविल्यास क्रमाने पुढील सम संख्या मिळते.
4) क्रमश: 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते.
5) क्रमश दोन सम अथवा विषम संख्यांचा गुणाकार (मधल्या संख्येचा वर्ग - 1)
नमुना प्रश्न
1) 1 ते 100 मध्ये एकूण किती सम संख्या आहेत ?
1) 25
2) 50
3) 75
4) 100
स्पष्टीकरण : एकूण संख्या 1 ते 100 मध्ये 100 असून त्यातील 50 संख्या समसंख्या व 50 संख्या ह्या विषम संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे.
चौथी शिष्यवृत्ती मराठी विषयाच्या आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट सोडवण्यासाठी - click करा
चौथी शिष्यवृत्ती इंग्रजी विषयाच्या आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट सोडवण्यासाठी - click करा
चौथी शिष्यवृत्ती गणित विषयाच्या आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट सोडवण्यासाठी - click करा
चौथी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता विषयाच्या आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट सोडवण्यासाठी - click करा
