प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - मराठी घटक : वाक्प्रचार

 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - चौथी 
 विभाग - मराठी 
  घटक  : वाक्प्रचार 



वाक्यातील ज्या शब्दापासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो, त्याला 'वाक्प्रचार' म्हणतात.

  • वाक्प्रचार हा एक शब्दसमूह आहे.
  • वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषा परिणामकारक होते. भाषेला एक वेगळेच सौदर्य प्राप्त होते.



1) अलगत उचलणे - हळुवारपणे उचलणे

२) दंग असणे - एखाद्या कामात तल्लीन होऊन जाणे किंवा मग्न होणे

वाटते.

३) एकटक पाहणे - टक लावून पाहणे

४) संकल्प करणे - निश्चय करणे, ठरवणे

५) थक्क होणे - नवल वाटणे, आश्चर्यचकित होणे

६) थरकाप उडणे - भीतीने अंग थरथर कापणे

७) हुज्जत घालणे - वाद घालणे

८) मनाला लागणे - वाईट वाटणे

९) मनात घोळत राहणे - नेहमी आठवणीत राहणे

१०) रवाना करणे - पाठवणे

११) खंत न बाळगणे - पर्वा न करणे

१२) हुरळून जाणे - आनंदी होणे

१३) न डगमगणे - न घाबरणे

१४) भारावून जाणे – खूप प्रभावित होणे

१५) चेहरा उतरणे - नाराज होणे

१६) धूम पळणे - जोराने पळणे

१७) झडप घालणे - वेगाने एखाद्याला पकडणे

१८) ठेंगा दाखवणे - चिडवण्यासाठी अंगठा दाखवणे

१९) डोके वर काढणे - एखादा विचार, भावना मनात पुन्हा पुन्हा येणे

२०) घाबरगुंडी उडणे - खूप घाबरणे

२१) आकाश ठेंगणे वाटणे - खूप आनंद होणे

२२) सामसूम होणे - शांतता पसरणे

२३) अधीर होणे - उत्सुक होणे


Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم