प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - गुणाकार व शाब्दिक उदाहरणे


 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 

विभाग - गणित 
 घटक - गुणाकार व शाब्दिक उदाहरणे 






गुणाकार - एकावरून अनेक वस्तूंची किंमत काढणे. या क्रियेला 'गुणाकार' म्हणतात.

  • गुणाकार या क्रियेमध्ये गुण्य, गुणक व गुणाकार हे घटक असतात.

  • कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार नेहमी शून्य येतो.

  • शाब्दिक उदाहरण नीट वाचून कोणती क्रिया करावी लागेल हे ठरविणे.

  • गुण्य, गुणक व गुणाकार यापैकी दोन घटक दिलेले असतात. तेव्हा तिसरा घटक काढता येतो.

  • कोणत्याही संख्येला एक ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या असते.

  • दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो.

  • या अंकांच्या गुणकारातील एकक स्थानी जो अंक असतो, तोच अंक मूळच्या दोन संख्याच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो.

  • कोणत्याही संख्येला अशा म्हणजे एकावर शून्य असणाऱ्या संख्यांनी गुणताना गुणाकारात गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील शून्यांएवढी शून्ये लिहावीत.

  • दोन अंकांचा गुणाकार करताना, गुणाकारात कोणता विशिष्ट अंक एकक स्थानी येईल, हे समजणे काही वेळा जरुरी असते. अपेक्षित गुणाकार मिळण्यासाठी कोणते दोन अंक निवडायला हवेत, हे ठरविणे आवश्यक असते. 



2 Comments

Thanks

  1. Replies
    1. ऐश्वर्या ज्ञानेश्वर पाटील

      Delete
Post a Comment
Previous Post Next Post