प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विषय - मराठी
घटक - काळ
काळ :
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडते, घडली किंवा घडणार आहे याचा जो बोध होतो, त्याला काळ म्हणतात.
काळाचे मुख्य ३ प्रकार:
वर्तमानकाळ :
व्याख्या: जेव्हा क्रिया आता घडत आहे असा बोध होतो, तेव्हा वर्तमानकाळ असतो.
ओळख: वाक्याच्या शेवटी आहे, आहेत, करतो, खाते, जातात अशी रूपे असतात.
उदाहरण: राजू अभ्यास करतो.
भूतकाळ :
व्याख्या: जेव्हा क्रिया पूर्वी घडून गेलेली असते, तेव्हा भूतकाळ असतो.
ओळख: वाक्याच्या शेवटी होता, होती, होते, गेला, खाल्ले, पाहिले अशी रूपे असतात.
उदाहरण: राजूने अभ्यास केला.
भविष्यकाळ :
व्याख्या: जेव्हा क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो, तेव्हा भविष्यकाळ असतो.
ओळख: वाक्याच्या शेवटी करेल, जाईल, खाईल, येतील अशी रूपे असतात.
उदाहरण: राजू अभ्यास करेल.