उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - सातवी
विषय - इंग्रजी
घटक - Word Formation (शब्दरचना )
Word formation म्हणजे मूळ शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी काही अक्षरे /अक्षरगट जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
Prefixes (उपसर्ग/पूर्वप्रत्यय)
मूळ शब्दाच्या सुरुवातीला काही अक्षरे जोडल्यास नवीन शब्द तयार होतो. उदा., correct - incorrect, national - international.
Suffixes (अंत्यप्रत्यय)
जे प्रत्यय शब्दांच्या नंतर / शेवटी लागतात, त्यांना Suffix (अंत्यप्रत्यय) म्हणतात. Suffixes जोडल्याने शब्दांच्या जातीत बदल होतो, noun to verb, verb to noun, adjective to adverb इत्यादी. काही Nouns ना Suffixes जोडल्यास नवीन Nouns सुद्धा तयार होतात.
Sad - sadly
Kind - kindly
Weak - weakly
Friend - friendship
Anger - angry
