प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विषय - इंग्रजी घटक - त्रिमिती वस्तू व घडणी

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
इयत्ता - चौथी 
विषय - इंग्रजी 
घटक - त्रिमिती वस्तू व घडणी 







1) त्रिमितीय वस्तू : ज्या वस्तूंची लांबी, रुंदी व उंची ही तीनही मापे मोजता येतात किंवा जाणवतात त्यांना 'त्रिमितीय वस्तू' म्हणतात. उदा. चंड, कपाट, पुस्तक

  • त्रिमितीय वस्तू वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्या असता वेगवेगळ्या दिसतात.

2) द्विमितीय वस्तू : फक्त लांबी व रुंदी असणाऱ्या, जाडी नसलेल्या किंवा नगण्य जाडीच्या वस्तूंन 'द्विमितीय वस्तू' म्हणतात.


3) घडण : त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय.

4) पेंटो मिनो : पाच चौरसांच्या कडा एकमेकांना जोडून 'पाच चौरसांची घडण' किंवा 'पेंटो मिनो' म्हणतात

  • सहा पृष्ठे असणाऱ्या इष्टिकाचिती आणि घन या त्रिमितीय आकाराच्या वस्तू (खोके) आढळतात.

  • इष्टिकाचितीची पृष्ठे आयताकार असतात.

  • घन/इष्टिकाचिती यांचे ६ पृष्ठभागांपैकी ३ पृष्ठभाग आपणास एका वेळी दिसतात.

  • एका घन/इष्टिकाचितीच्या २ किंवा ३ किंवा ४ - विविध स्थिती दाखविल्या जातात. त्यावरून त्याच्या त्रिमित रूपाची कल्पना करून विचारलेल्या पृष्ठभागावरील प्रश्नांची उत्तरे आपणास द्यायची असतात.




Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم