उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - सातवी
विभाग - इंग्रजी
घटक - Opposite and Similar Meaning Words
एखादया शब्दाचा उलट अर्थ असणारा दुसरा शब्द महणजे Opposite (विरुद्धार्थी शब्द) होय ते भाषेतील दोन भिन्न संकल्पना दर्शवतात.
उदा., happy x unhappy (आनंदी × दुःखी)
एखादया शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे Similar meaning word (समानार्थी शब्द) होय. समानार्थी शब्द भाषेतील एकच संकल्पना दर्शवतात.
उदा., loyal - faithful, beautiful - pretty
1. Opposites with prefixes: (पूर्वप्रत्यय लावून होणारे विरुद्धार्थी किंवा नकारार्थी शब्द :)
शब्दांपूर्वी पुढील प्रकारचे प्रत्यय लावून असे शब्द तयार करता येतात.
(1) 'un-' able x unable
(2) 'In-' complete x incomplete
(3) 'im-' proper improper
(4) 'dis-' agree x disagree
(5) 'mis-' guide x misguide
(6) 'ir-' regular x irregular
(7)'il-' legal x illegal
(8) 'anti-' social xantisocial
(9) changing one prefix for another
encourage × discourage
interior x exterior
2. Opposites with suffixes: (शब्दांच्या शेवटी विशिष्ट प्रत्यय लावून होणारे विरुद्धार्थी शब्द :) शब्दांच्या शेवटी पुढीलप्रमाणे 'ful-' ऐवजी 'less-' प्रत्यय लावून विरुद्धार्थी किंवा नकारार्थी शब्द तयार करता येतात.
उदा., carefulx careless
fearful × fearless
3. काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द वेगळ्याच प्रकारे स्वतंत्र शब्द वापरून होतात, हे आपण शिकलो आहोत.
उदा., broad × narrow
begin × finish, end
above x below
4. काही शब्दांचे एकापेक्षा अधिक विरुद्धार्थी शब्द असू शकतात.
उदा., coward × brave, courageous, fearless.
genuine × fake, spurious, false.
sadly x happily, merrily, cheerfully.
bright × pale, dull, dim
