उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विषय - मराठी घटक - पारिभाषिक शब्द/ Paribhashik shabd

 उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

इयत्ता - सातवी 

विषय - मराठी 

घटक - पारिभाषिक शब्द 




एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत वापरण्यासाठी जो पर्यायी शब्द वापरला जातो, त्याला 'पारिभाषिक शब्द' म्हणतात. कोणत्याही कार्यालयात किंवा इतरत्र कुठेही, कोणत्याही प्रकारच्या मजकुराचा अनुवाद करताना असे शब्द वापरले जातात. एका शब्दाला एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात; परंतु प्रत्येक शब्दाची अर्थच्छटा वेगळी असते. अनुवाद करताना ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागते.


पारिभाषिक शब्द (इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी पारिभाषिक शब्द) :


ऑर्गनायझेशन् - संघटना


ऑडिओ आवाज, ध्वनीविषयक


ऑपरेटिंग - चालवणे


ऑपरेशन - शस्त्रक्रिया


अकाऊंट - जमाखर्च


 अॅक्टर - अभिनेता


अॅप्लिकेशन - अर्ज


अॅम्बुलन्स - रुग्णवाहिका


अंपायर - पंच


इन्फर्मेशन - माहिती


इन्फेक्शन - लागण


इन्फ्रास्ट्रक्चर - पायाभूत सुविधा


इन्व्हेस्टमेंट - गुंतवणूक


इंटरकास्ट - आंतरजातीय


इंटरनेट - आंतरजाल


इंडस्ट्रिलायझेशन - औद्योगिकीकरण


ई-मेल - संगणकीय पत्र, ई-पत्र


एक्स-रे - क्ष-किरण


कनेक्टिव्हिटी - जोडणी


कम्युनिकेशन - संवाद


करिक्युलम - अभ्यासक्रम


कंप्यूटर - संगणक


कोर्ट - न्यायालय


की-बोर्ड - कळफलक


केबल - तार


कॅप्टन - कर्णधार


कैमेरा - छायाचित्र काढायचे यंत्र


कैरीकॅचर - व्यंगचित्र


कॅश - रोकड


कँडल - मेणबत्ती


क्लॉक - घड्याळ


गव्हन्मेंट - शासन, सरकार


गेम्स - स्पर्धा, खेळ


गॅलॅक्सी - आकाशगंगा


ग्राऊंड - मैदान


ग्लोबलायझेशन - जागतिकीकरण


चॅट - गप्पा


झेरॉक्स - प्रतिमुद्रा


टेक्नॉलॉजी - तंत्रज्ञान


टेपरेकॉर्डर - ध्वनिमुद्रक


टेलिफोन - दूरध्वनी


टेलिव्हिजन - दूरदर्शन


ट्रान्सलेशन - भाषांतर, अनुवाद


डायरेक्टर - दिग्दर्शक


डिस्क - तबकडी


डिस्प्ले - प्रदर्शक


डॉक्टर - वैदय


थ्री डी - त्रिमिती


नर्स - परिचारिका


नेटवर्क - एकमेकांशी जोडलेल्या संस्था


नॅशनल - राष्ट्रीय


न्यूजपेपर - वर्तमानपत्र


पार्लमेंट - संसद


पासवर्ड - सांकेतिक/परवलीचा शब्द


पिक्चर - चित्रपट


पेन्शन - निवृत्तिवेतन


पेमेंट - पगार, वेतन


पेशंट - रुग्ण

पोल्यूशन - प्रदूषण


प्रोग्रॅम - कार्यक्रम


प्रोजेक्टर - प्रक्षेपक


प्रोटोकॉल - वागण्याचे नियम, रिवाज, प्रथा


प्रोसेस - प्रक्रिया


प्लेअर - खेळाडू


प्रिंट - छाप, ठसा


प्रिंटर - मुद्रक


फंक्शन - कार्य


फंडामेंटल - मूलभूत


फाऊन्डेशन - पाया


फोर्क - काटे-चमचा


फिल्डर - क्षेत्ररक्षक


फॅन - पंखा


फॉन्टस् - टंकसमूह


फॉर्मेट - आराखडा, ढाचा


बकेट - बादली


बेसिक - मूलभूत


बॅट - चेंडूफळी


बॉलर - गोलंदाज


मिरर - आरसा


मेसेज - संदेश


मोबाइल - भ्रमणध्वनी


मॉनिटर - दृश्यपटल


म्युझिक - संगीत


युझर - वापरकर्ता


रोबो - यंत्रमानव


रेडिओ - आकाशवाणी


रेंज - टप्पा,पल्ला 


मराठी भाषेत वापरले जाणारे इतर भाषेतील शब्द व नवनवीन वैज्ञानिक संज्ञा


* कानडी (कन्नड): भाकरी, तूप, कुंची, कांबळे, अक्का, ताई, गाजर, अडकित्ता, खलबत्ता, विळी, गुर्दा किल्ली, चाकरी, खिंड, बांबू इत्यादी.


* गुजराती : घी, दादर, दलाल, डबा, रिकामटेकडा, शेट इत्यादी.


* हिंदी : दिल, बच्चा, और, भाई, बात, दाम, करोड, मिठाई इत्यादी.


* पोर्तुगीज : बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, मेस्त्री, चावी, मेज, पेरू इत्यादी.


* फारसी : अत्तर, अब्रू, खाना, पेशवा, पोशाख, सामना, हकिकत, कारभार, सरकार, दरबार इत्यादी.


* अरबी : अर्ज, ऊर्फ, इनाम, जाहीर, मंजूर, खर्च, हुकूम, मेहनत, करार, कर्ज इत्यादी.


* तेलुगू : चेंडू, अनारसा, शिकेकाई, ताळा, किडूकमिडूक.

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post