उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - सातवी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - वर्गीकरण 3 : संख्या
ओळख या उपघटकातील प्रश्नांत चार संख्या दिलेल्या असतात. यांतील तीन संख्यांमध्ये साम्य अ त्यामुळे त्यांचा गट तयार होतो व एक संख्या त्या गटाशी साम्य नसल्यामुळे, गटात न बसणारी असते.
महत्त्वाचे मुद्दे
साम्य दाखवणाऱ्या तीन संख्यांचा संबंध शोधण्यासाठी संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया महत्त्वाच्या असतात त्यामुळे,
(1) पाढे लक्षात ठेवा.
(2)1 ते 30 संख्यांचे वर्ग 1 ते 10 संख्यांचे घन 1 ते 100 मूळ संख्या लक्षात ठेवा. तसेच त्रिकोणी संख्य जोडमूळ संख्यासुद्धा लक्षात ठेवा.
(3) दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार/भागाकार, सम-विषम संख्या यांच विचार करा.
(4) अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना याचा विचार करा.
(5) तसेच, संख्येला 3. 4. 5. 6. 8. 9. 10 व 11 यांपैकी कोणत्या संख्येने भाग जातो हे ठरवण्यासारी वापरल्या जाणाऱ्या कसोट्या लक्षात ठेवा.
.jpg)