प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - बुद्धिमत्ता
घटक - आकलन
उपघटक - सूचनापालन - जोडाक्षरे, शब्द, अक्षर
'सूचनापालन' या घटकामध्ये शब्द व वाक्य यावर आधारित प्रश्न दिलेले असतात. शब्द, वाक्ये व जोडाक्षरे याचा उपयोग करून विद्यार्थ्यांने कोणती क्रिया करावी हे समजून घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या योग्य पर्यायापर्यंत जायचे असते.
- आपण प्रश्न सोडवित असताना आपल्या हाताची जशी बाजू असत, त्याप्रमाणे उजवी व डावी बाजू ठरवावी.
- शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून सुरूवातीच्या अक्षरापर्यंत वाचत जाणे, यालाच 'उलट क्रमाने वाचणे' असे म्हणतात.
- शब्दांचे पहिले अक्षर ही डावी बाजू व शब्दांचे शेवटचे अक्षर ही शब्दांची उजवी बाजू असते.
- शब्दाचे सुरूवातीचे अक्षर किंवा शब्दाचे पहिले अक्षर म्हणजे डावीकडील टोकाचे अक्षर, शब्दाचे शेवटचे अक्षर म्हणजे उजवीकडील टोकाचे अक्षर होय.
- शब्दातील एखाद्या अक्षराचे उजवीकडील/डावीकडील अक्षरांचे स्थान ठरवताना, त्या अक्षराला वगळून त्याच्या लगतचे अक्षर पहिले धरावे आणि याच क्रमाने पुढील अक्षरांचे स्थान मोजावे. उदा. 'विमान' या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या पुढील अक्षर 'न' हे आहे.
नमुना प्रश्न
प्र. 1 'न ना र्द ता ज न ज' या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतली, तर जनता या अर्थाचा शब्द मिळेल ?
1) 1, 4, 3
2) 2, 4, 1
3) 6, 7, 3
4) 1, 2, 3
स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील अक्षरापासून 'जनताजनार्दन' हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. पहिले अक्षर ज, दुसरे अक्षर न आणि तिसरे अक्षर ता हे घेतल्यात 'जनता' शब्द मिळतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.
प्र.2 अंतराळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण या वाक्यात आलेली जोडाक्षरांची संख्या किती ?
1) 1
2) 2
3) 1
4) 0
स्पष्टीकरण : वरील वाक्यात ध्या व न्ह ही दोन जोडाक्षरे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे.
