राष्ट्रीय गणित दिन प्रश्नमंजुषा
श्रीनिवास रामानुजन (२२ डिसेंबर १८८७ – २६ एप्रिल १९२०) हे भारतातील महान गणितज्ञ होते. त्यांचा जन्म तामिळनाडूतील इरोड येथे झाला. औपचारिकशिक्षण कमी असूनही त्यांनी गणितातील संख्या सिद्धांत, अनंत श्रेणी, सतत भिन्न, विभाजन संख्या (Partitions) या क्षेत्रांत अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन केले.
त्यांची असामान्य गणिती प्रतिभा ओळखून ब्रिटिश गणितज्ञ जी. एच. हार्डी यांनी त्यांना केंब्रिज विद्यापीठात आमंत्रित केले. रामानुजन यांनी अनेक मौलिक सूत्रे मांडली, जी आजही गणित आणि भौतिकशास्त्रात वापरली जातात. त्यांच्या कार्यामुळे त्यांना फेलो ऑफ द रॉयल सोसायटी हा मान मिळाला.
अल्पायुष्यातही त्यांनी गणिताला अमूल्य योगदान दिले आणि आजही ते जगभरातील गणितज्ञांसाठी प्रेरणास्थान आहेत.
सदर प्रश्नमंजुषा स्पर्धा सर्व वयोगटातील गणित प्रेमींसाठी असून सर्वांनीच ही सोडवावी.
