प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - संख्याज्ञान उपघटक - अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
विभाग - गणित
 घटक - संख्याज्ञान
उपघटक - 
अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी 




इयत्ता चौथी शिष्यवृत्ती गणित सराव चाचणी






  • स्थानिक किंमत : संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही अंक ज्या स्थानावर आहे त्यानुसार ठरते. अंकाची स्थानिक किंमत = अंक स्थानाची किंमत

  • उदा. 67867 मध्ये 8 ची स्थानिक किंमत = 8 X ('शतक' स्थानाची किंमत) = 8 X 100 = 800

  • संख्येतील अंक ज्या स्थानी आहे त्या स्थानाच्या किंमतीने अंकाला गुणावे म्हणजे अंकाची स्थानिक किंमत मिळते.

  • दर्शनी किंमत : संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकांच्या मूल्याइतकी असते. उदा. 3445674 मध्ये 3,4,4,5,6,7,4 यांची दर्शनी किंमत अनुक्रमे 3,4,4,5,6,7,4 ही आहे.

  • एखाद्या संख्येतील एकक व दशक स्थानांच्या अंकांची अदलाबदल केली, तर तयार होणारी संख्या व मूळ संख्या यांमधील फरक त्या दोन अंकांतील फरकाच्या 9 पटीत असतो. उदा. 4595 या संख्येतील 9 व 5 या अंकांची अदलाबदल केली, तर तयार होणारी संख्या 4559 आणि मूळ संख्या 4595 यांमधील फरक 4595455936 आहे. 369 (9-5) = 95

  • एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानांवर समान अंक असेल, तर त्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक त्या अंकांच्या नऊ पट असतो.

  • उदा. 6655 या संख्येतील दशक व एकक स्थानांवर 5 हा अंक आहे. त्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक (50-5) = 45 आहे. 45 = 4 द 5

  • जर एखाद्या संख्येत शतक व एकक स्थानी तोच अंक असेल, तर त्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक हा त्या अंकाच्या 99 पट असतो. तसेच हजार व एकक स्थानी समान अंक असेल, तर त्या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक त्या अंकाच्या 999 पट असतो.

  • 0 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखीच म्हणजे 0 असते.

  • विस्तारीत मांडणी: संख्येतील अंकांच्या स्थानिक किंमती बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारीत रूप लिहिणे.

  • उदा. 24,54,345 = (2X1000000)+(4×100000) + (5X10000) + (4X1000) +(3X100) + (4X10)+(5X1)
                     =2000000+400000+50000+4000+300+40+                           500000



वरील घटकाचा अभ्यास करून खालील टेस्ट सोडवा.


इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आमचा whats app ग्रुप जॉईन करा⤵️



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post