NMMS परीक्षा 2025 प्रवेश पत्र डाउनलोड करा| NMMS EXAM 2025 HALL TICKET DOWNLOAD

 NMMS परीक्षा 2025 प्रवेश पत्र डाउनलोड करा


NMMS EXAM 2025 HALL TICKET DOWNLOAD 






राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २८ डिसेंबर, २०२५

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २८ डिसेंबर, २०२५ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७५८ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३,७८९ शाळा व एकूण २,५०,५४४ विद्याथ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या वतीने शाळा लॉगिनवर दि. १० डिसेंबर २०२५ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २७/१२/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या /अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.

NMMS परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा ⤵️



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post