प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - गणित
घटक - कालमापन : घड्याळ तास, मिनिटे परस्पर रूपांतर
तास, मिनिटे व सेकंद ही कालमापनाची एकके आहेत.
1 तास = 60 मिनिटे, 1 मिनिट = 60 सेकंद
1 तास = 60 × 60 = 3600 सेकंद
पाव तास = 15 मिनिटे,
अर्धा तास = 30 मिनिटे,
पाऊण तास = 45 मिनिटे
तासाची मिनिटे व मिनिटाचे सेकंद करताना 60 ने गुणावे.
सेकंदाची मिनिटे व मिनिटाचे तास करताना 60 ने भागावे.
कालमापनासाठी घड्याळ हे साधन वापरतात. घड्याळातील वेळ सांगण्याचे 12 ताशी व 24 ताशी असे दोन प्रकार आहेत. 'आगगाडी ।। वाजता सुटणार आहे' या वाक्यावरून सकाळी 11 वाजता, की रात्री 11 वाजता हे कळत नाही. नेमकेपणासाठी दुपारचे 12 वाजण्यापूर्वीची वेळ व दुपारचे 12 वाजल्यानंतरची वेळ असा शब्दप्रयोग करणे गरजेचे असते. त्यासाठी 'म.पू' आणि 'म.उ' हे शब्दप्रयोग वापरतात.
12 ताशी कालमापन पद्धती :
मध्यान्ह: दुपारी 12 वाजले म्हणजे मध्यान्ह होय.
मध्यान्हपूर्व : दुपारचे 12 ते रात्रीचे 12 पर्यंतच्या कालावधीस मध्यान्हपूर्व कालवधी (झच) म्हणतात. दुपारचे 2 वाजून 30 मिनिटे ही वेळ मध्यान्हपूर्व 2:30 किवा 2:30 झच असे दाखवतात.
मध्यान्होत्तरः रात्रीचे 12 ते दुपारचे 12 पर्यंतच्या कालावधीस मध्यान्होत्तर कालवधी (अच) म्हणतात.
सकाळचे 8 वाजून 40 मिनिटे ही वेळ मध्यान्होत्तर 8:40 किवा 8:40 अच असे दाखवतात.
24 ताशी कालमापन पद्धती : या कालगणनेत मध्यरात्री 12 वाजता 0 वाजले असे म्हणतात. त्या वेळेपासून दुसऱ्या दिवशीच्या 12 वाजेपर्यंत म. पू. प्रमाणेच कालगणना होते. त्यापुढे एक तास झाला म्हणजे 13 वाजले असे म्हणतात. 13:45 म्हणजे दुपारचे 1 वाजून 45 मिनिटे असा अर्थ होते. 'आगगाडी मुंबईहून 23:00 वाजता निघते' म्हणजे ती रात्री 11 वाजता निघते असा अर्थ होतो. मध्यान्होत्तर 6 वाजले असता (12+6) = 18 वाजले आहेत, असे म्हणतात.
नमुना प्रश्न •
प्र.1) दोन तास + सव्वा तास = किती सेकंद ?
1) 27500
2) 11700
3) 9900
4) 8100
स्पष्टीकरण : एका तास = 60 मिनिटे, 1 मिनिट = 60 सेकंद म्हणजेच एका तास = 3600 सेकंद म्हणून दोन तास = 23600 = 7200, सव्वा तास = 13600+900=4500 7200 + 4500 = 11700 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे.