उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - सातवी
विभाग - इंग्रजी
घटक - Stock Expressions ( अभिव्यक्ती )
1. Stock Expression म्हणजे काय?
Stock Expression म्हणजे असे वाक्य किंवा शब्दसमूह जे आपण नेहमी ठराविक प्रसंगी वापरतो.
हे वाक्य पूर्ण अर्थ देतात आणि बोलताना किंवा लिहिताना वारंवार वापरले जातात.
☑️ सोप्या भाषेत सांगायचे झाले तर:
Specific situation मध्ये नेहमी वापरले जाणारे तयार वाक्य = Stock Expression
2. Stock Expression चे उदाहरणे
Situation Stock Expression
अभिवादन Good morning
आभार मानणे Thank you
माफी मागणे I am sorry
परवानगी मागणे May I come in?
मदत देणे May I help you?
अभिनंदन Congratulations!
निरोप See you again
शुभेच्छा Best of luck
3. काही महत्वाचे Stock Expressions
Excuse me – माफ करा / लक्ष वेधण्यासाठी
Thank you very much – खूप धन्यवाद
You are welcome – स्वागत आहे
Never mind – काही हरकत नाही
Of course – नक्कीच
All the best – शुभेच्छा
Well done – छान केले

