प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - परिमिती - त्रिकोण, आयत, चौरस

 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - चौथी 

 विभाग - गणित

घटक - परिमिती - त्रिकोण, आयत, चौरस


लांबी, वस्तुमान, धारकता या घटकावरील ऑनलाईन test सोडवा.

परिमिती : बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय.


बहुभुजाकृती : बहु - जास्त, भुजा बाजू, जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती.


त्रिकोण : तीन बाजू असलेली बंदिस्त आकृती.


चौरस - चारही कोन काटकोन व चारही बाजू समान असलेल्या चौकोनाला 'चौरस' म्हणतात.


आयत - ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात तसेच चारही कोन काटकोन असतात. त्या आकृतीला 'आयत' म्हणतात.






नमुना प्रश्न 

1) एक समभुज त्रिकोणाची बाजू १५ सें.मी. असल्यास त्याची परिमिती ?

1) ६०

2) ४५

३) ७०

4) ८०

स्पष्टीकरण : समभूज त्रिकोणाला तीन बाजू आहेत. त्रिकोणाची परिमिती = तिन्ही बाजूंची बेरीज म्हणून १५ सें.मी. + १५ सें.मी. + १५ सें.मी. = ४५ सेंमी. म्हणून पर्याय क्रमांक २ हे बरोबर उत्तर आहे

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم