प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - मराठी
घटक - समूहदर्शक शब्द
जेव्हा कोणत्याही एकाच जातीचे निर्जीव किंवा सजीव एकत्र येतात, त्यांचा समूह तयार होतो. तेव्हा त्या समूहाला अर्थ येण्यासाठी एक वेगळाच शब्द वापरला जातो, अशा शब्दाला समूहदर्शक शब्द म्हणतात.
अनेक वस्तू अथवा प्राणी एकत्र असतील तर त्यास समूह किंवा समुदाय म्हणतात. हे दर्शविण्यासाठी भाषेत निरनिराळ्या शब्दांचा उपयोग केला जातो. अनेक फुले एकत्र बांधली तर त्यास फुलांचा गुच्छ म्हणतात. पण अनेक पुस्तके एकत्र बांधली तर त्यास पुस्तकांचा गठ्ठा म्हणतात. समूह दर्शविण्यासाठी योग्य शब्दांचाच वापर केला पाहिजे.
कमी शब्दांचा वापर करून आपले म्हणणे मांडण्यासाठी समूहदर्शक शब्द वापरले जातात. मराठी भाषेमध्ये दैनंदिन व्यवहारात आपण या शब्दांचा वापर नेहमीच करत असतो.
पुढील समूहदर्शक शब्द लक्षात ठेवा.
उपकरणांचा : संच
उंटांचा/ लमानांचा : तांडा
केसांचा : पुंजका, झुबका
करवंदाची : जाळी
केळ्यांचा : घड, लोंगर
काजूंची : गाथण
किल्ल्यांचा, चाव्यांचा : जुडगा
खेळाडूंचा : संघ
माशांची : गाथण
गाईगुरांचे : खिल्लार
गुरांचा : कळप
गवताचा : भारा
गवताची : पेंडी, गंजी
चोरांची, दरोडेखोरांची : टोळी
जहाजांचा : काफीला
ताऱ्यांचा : पुंजका
तारकांचा : पुंज
द्राक्षांचा : घड, घोस
दुर्वाची : जुडी
धान्याची : रास
नोटांचे : पुडके
नाण्यांची : चळत
नारळाचा : ढीग
पक्ष्यांचा : थवा
प्रशपत्रिकांचा, पुस्तकांचा : संच
पालेभाजीची : जुडी, गड्डी
वह्यांचा : गठ्ठा
पोत्यांची, नोटांची : थप्पी
पिकत घातलेल्या आंब्याची : अढी
फळांचा : घोस
फुलझाडांचा : ताडवा
फुलांचा : गुच्छ
बांबूचे : बेट
भाकरीची : चळड
मडक्यांची : उतरंड
महिलांचे : मंडळ
लाकडांची, उसाची : मोळी
वाघाचा : वृंद
विटांचा, कलिंगडाचा : ढीग
विद्यार्थ्यांचा : गट
माणसांचा : जमाव
मुलांचा : घोळका
मुग्यांची : रांग
मेंढ्याचा : कळप
विमानांचा : ताफा
आंब्याच्या झाडांची : आमराई /राई
वेलींचा : कुंज
साधूंचा : जथा
हरणांचा, हत्तींचा : कळप
सैनिकांची/चे : तुकडी, पलटण, पथक
ढगांचा : घनमंडल
फळांचा : घोस
मुलांचा, मुलींचा : घोळका
माणसांचा : घोळका
पोळ्यांची : चवड, चळत
घरांची : चाळ
केसांची : जट
चाव्यांचा : जुडगा
वानरांची : टोळी
वाळूचा : ढीग
फुल झाडांचा : ताटवा
यापूर्वी झालेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या मराठी विषयाच्या सर्व टेस्ट सोडवण्यासाठी - क्लिक करा
