उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - सातवी
विभाग - मराठी
घटक - आलंकारिक शब्द
आलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात. मराठी भाषेमध्ये दैनंदिन व्यवहारात आपण या शब्दांचा वापर नेहमीच करत असतो.
जसे -
छत्तीसचा आकडा - शत्रुत्व
उंबराचे फुल - दुर्मीळ वस्तू
अकलेचा कांदा - मूर्ख
पिकले पान - म्हातारा
कर्णाचा अवतार - उदार मनुष्य
कुंभकर्ण - अतिशय झोपाळू
कोल्हेकुई - क्षुद्र लोकांची बडबड
खडाजंगी - मोठे भांडण
खडाष्टक - जोरदार भांडण
गर्भश्रीमंत - जन्मापासुन श्रीमंत
बिनभाडयाचे घर- तुरूंग
मंथरा -दुष्ट स्त्री
मारूतीचे शेपूट - लांबत जाणारे काम
नंदीबैल - हो ला हो म्हणणारा
पर्वणी - दुर्मीळ योग
पांढरा कावळा - निसर्गात नसलेली गोष्ट
पांढरा परीस - लबाड
पोपटपंची - अर्थावीण पाठांतर करणे
बृहस्पती - बुद्धिमान
भाकड कथा - बाष्कळ गोष्टी
मायेचा पूत - पराक्रमी मनुष्य, मायाळू
मृगजळ - केवळ आभास
नकार - वाटण्याच्या अक्षता
वाहती गंगा - आलेली संधी
श्रीगणेशा - प्रारंभ
दगडावरची रेघ - कधीही न बदलणारे
लंकेची पार्वती - गरीब स्त्री
वामनमूर्ती - ठेंगू, बुटका माणूस
शकुनीमामा - कपटी मनुष्य
सांबाचा अवतार - अत्यंत भोळा मनुष्य
सूर्यवंशी - उशिरा उठणारा
यापूर्वी झालेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या मराठी विषयाच्या सर्व टेस्ट सोडवण्यासाठी - क्लिक करा

Kay
ردحذف