उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - मराठी घटक - आलंकारिक शब्द

 

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - सातवी
विभाग - मराठी
 घटक - आलंकारिक शब्द 







आलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात. मराठी भाषेमध्ये दैनंदिन व्यवहारात आपण या शब्दांचा वापर नेहमीच करत असतो.

जसे - 
छत्तीसचा आकडा - शत्रुत्व

उंबराचे फुल - दुर्मीळ वस्तू

अकलेचा कांदा - मूर्ख

पिकले पान - म्हातारा 

कर्णाचा अवतार - उदार मनुष्य

कुंभकर्ण - अतिशय झोपाळू

कोल्हेकुई - क्षुद्र लोकांची बडबड

खडाजंगी  - मोठे भांडण

खडाष्टक - जोरदार भांडण

गर्भश्रीमंत  - जन्मापासुन श्रीमंत

बिनभाडयाचे घर- तुरूंग

मंथरा -दुष्ट स्त्री

मारूतीचे शेपूट - लांबत जाणारे काम

नंदीबैल - हो ला हो म्हणणारा

पर्वणी - दुर्मीळ योग

पांढरा कावळा - निसर्गात नसलेली गोष्ट

पांढरा परीस - लबाड

पोपटपंची - अर्थावीण पाठांतर करणे

बृहस्पती - बुद्धिमान

भाकड कथा - बाष्कळ गोष्टी

मायेचा पूत - पराक्रमी मनुष्य, मायाळू

मृगजळ - केवळ आभास

नकार  -  वाटण्याच्या अक्षता

वाहती गंगा  -  आलेली संधी

श्रीगणेशा -  प्रारंभ

दगडावरची रेघ - कधीही न बदलणारे

लंकेची पार्वती - गरीब स्त्री

वामनमूर्ती  - ठेंगू, बुटका माणूस

शकुनीमामा - कपटी मनुष्य

सांबाचा अवतार - अत्यंत भोळा मनुष्य

सूर्यवंशी - उशिरा उठणारा


यापूर्वी झालेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या मराठी विषयाच्या सर्व टेस्ट सोडवण्यासाठी - क्लिक करा


1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post