प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - मराठी
घटक - ध्वनिदर्शक शब्द
आपल्या परिसरात अनेक ध्वनी निर्माण होत असतात. यामध्ये वाहनांचा आवाज, पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, किटकांचा आवाज, वाद्यांचा आवाज इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारच्या आवाजाला विशिष्य शब्द वापरले जातात त्याला ध्वनीदर्शक शब्द म्हणतात.
ध्वनिदर्शक शब्द
कुत्र्यांचे - भुंकणे
गाईचे - हंबरणे
कोल्ह्याची - कोल्हेकुई
बैल - डरकणे
मेंढी - बे $ बे
शेळी - बे $ बे
घोडा - खिंकळणे
डुकराची - डूरडूर
वाघाची - डरकाळी
सिंहाची - गर्जना
म्हैस - रेकणे
हत्ती - चित्कारणे
माकडाचा - भुभुःकार
माणूस - गोंगाट
गाढवाचे - ओरडणे
हंस - कलरव
मोरांची -केकराव
कोल्ह्यांची - कोल्हेकुई
कबुतराचे -घुमणे
मांजरीचे - म्याँवऽ म्यॉवऽ
चिमणी - चिवचिव
पारव्याचे - घुटर्रघुमऽऽ
कावळाची - कावकाव
कोकिळांचे - कुहुकुहू
कोंबड्याचे - आरवणे
घुबडांचा - घुत्कार
पक्ष्यांचे भांडण - कलकलाट
पाखरांची - किलकिबल
जात्याची - घरघर
वासाचा - घमघमाट
पक्ष्यांचे भांडण - कलकलाट
दिव्यांचा - लखलखाट
बांगड्यांची - किणकिण
घंटेची - घणघण
पैंजणांचे - घुमघुम
नाण्यांचा - छनछनाट
पंखांची - फडफड
मधमाश्यांचा - गुंजारव
पालीची - चुकचुक
भुंग्याचा - गुंजारव
डास - गुणगुण
हृदयाची - धडधड
ढगांचा - गडगडाट
तलवारीचा - खणखणाट
पानांची - सळसळ
पाण्याचा - खळखळाट
रक्ताची - भळभळ
वारा - घोंघावणे
घुस - चिरचिर
चांदण्याची - चमचम
घड्याळाची - टिकटिक
उंदराची - चिरचिर
रातकिड्यांची - किरकिर
पावसाची - रिमरिम
थंडीची - हुडहुड

Shivam
ReplyDeleteSamarth
ReplyDeleteSamarth
ReplyDelete