प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - इंग्रजी घटक - Punctuation Marks

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
 विभाग - इंग्रजी 
  घटक - Punctuation Marks 






Capitalisation चे मुख्य नियम :

1. वाक्याची सुरुवात : वाक्याच्या पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर नेहमी मोठे लिहायचे.

उदा.: This is my book.  She is a teacher.

2. व्यक्तींची नावे (Proper Nouns) माणसांची, ठिकाणांची, देशांची, शहरांची, नद्यांची, पर्वतांची, संस्थांची नावे इ.
उदा.: Amit, India, Mumbai, Mount Everest, Ganga River, Oxford University

3. आठवड्याचे दिवस, महिन्यांची नावे

उदा.: Mondy, Friday, January,, Sunday

4. देव, धर्म, पवित्र ग्रंथ इ.

उदा.: God, Ram, Krishna, Bible

5. 'I' हा शब्द : '।' नेहमी मोठ्या अक्षरात लिहायचा.
उदा.: I am a student, Ravi and I went to school.

6. दुहेरी अवतरण चिन्ह : दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याच्या सुरूवातीच्या शब्दातील पहिले अक्षर कॅपिटल काढतात.
उदा.: Teacher said, "Keep quiet."


Comma (स्वल्पविराम) : वाक्यातील दोन किंवा अधिक शब्द, वाक्यांश किंवा उपवाक्ये यांना थोडासा थांबा देण्यासाठी किंवा वेगळे दाखवण्यासाठी वापरला जाणारा विरामचिन्ह म्हणजे स्वल्पविराम (Comma) होय. किंवा एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास त्या दोहोंमध्ये स्वल्पविराम द्यावा.

1) राम, श्याम आणि सीता शाळेत गेले.

* Ram, Shyam, and Sita went to school.

2) पाऊस आला, तरी आम्ही बाहेर गेलो.

* It rained, yet we went outside.

3) हो, मला ते माहित आहे.

* Yes, I know that.

Full stop (पूर्णविराम) : वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी लावले जाणारे विरामचिन्ह म्हणजे पूर्णविराम (.) होय. हे वाक्य संपल्याचे दर्शवते.

नावाच्या आद्याक्षरानंतर देखिल पूर्ण विराम द्यावा लागतो.

संक्षिप्त रूपात अद्याक्षरानंतर पूर्ण विराम द्यावा.

उदाहरणे :

1) राम शाळेत जातो.
Ram goes to school.


2) ती पुस्तक वाचते.
She reads a book.

3) सूर्य पूर्वेकडे उगवतो.
The sun rises in the east.

Question Mark (प्रश्नचिन्ह): प्रश्न विचारणाऱ्या वाक्याच्या शेवटी लावले जाणारे विरामचिन्ह म्हणजे प्रश्नवाचक चिन्ह (Question Mark) होय.

* हे वाक्य प्रश्नार्थक असल्याचे दर्शवते.

उदाहरणे :

1) तू कुठे जात आहेस?

Where are you going?

2) तुझे नाव काय आहे?

What is your name?

3) तू शाळेत गेला का?

→Did you go to school?

Apostrophe (षष्ठीदर्शक चिन्ह) : वाक्यातील शब्दांमध्ये अक्षरांचा लोप (missing letters) दाखवण्यासाठी किंवा मालकी (possession) दर्शवण्यासाठी वापरले जाणारे विरामचिन्ह म्हणजे Apostrophe (') होय.

उदाहरणे :

1) I am → I'm

2) He is He's

3) Do not → Don't

4) It is → It's

Exclamation Mark (उद्‌गार वाचक चिन्ह): आश्चर्य, आनंद, दुःख, राग, भीती, प्रशंसा, हाक, भावना किंवा तीव्र उद्गार व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे विरामचिन्ह म्हणजे उद्गारवाचक चिन्ह (Exclamation Mark) होय.

उदाहरणे :

1) अरे वा! तू खूप छान गाणं गातोस !

→ Wow! You sing very well!

2) अरे देवा ! किती मोठं वादळ आहे !

→ Oh God! What a big storm!


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post