प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - समसंबंध : शब्दसंग्रह
समसंबंध याप्रकारात खालील तीन उपघटकावर आधारित प्रश्न विचारले जातात
1) शब्दसंग्रह
2) आकृत्या
3) संख्या
4) इंग्रजी अक्षरमाला
उपघटक : 1 शब्दसंग्रह
शब्दसंग्रह या घटकामध्ये प्रश्नामध्ये तीन पदे दिलेली असतात आणि चौचे पद विचारलेले आते. यामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध जसा संबंध असतो तसा संबंध हा तिसन्या व चौथ्या पदाशी असतो तो ओळखून योग्य पर्याय निवडायचा असतो.
पहिल्या दोन शब्दामध्ये गुण, लिंग, आकार, चव, रंग, उपयोग, विशिष्ट क्रम इ. प्रकारचा संबंध अम् शकतो.
यामध्ये पाठ्यपुस्तकातील सामान्यज्ञान आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात.
नमुना प्रश्न
प्र.1 व 2 साठी सूचना : खालील प्रश्नांत पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय क्रमांक रंगवा.
प्र.1) मांजर : पिल्लू : : सिंह : ?
1) छावा
2) पिल्लू
3) रेडकू
4) बाळ
स्पष्टीकरण : वरील प्रश्नांत मांजराच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात तर सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.
2) भजी : तळणे : : भाकरी : ?
1) तळणे
2) भाजणे
3) मळणे
4) खाणे
स्पष्टीकरण : वरील प्रश्नांत भजी तळतात. तर भाकरी भाजतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे.
